नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आजच्या तरुण पिढीबाबत केलेल्या वक्तव्याची राज्यभर चर्चा रंगली आहे. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘Gen Z’ पिढीची बदलती जीवनशैली, वाढता स्क्रीन टाइम आणि सोशल मीडियाचा प्रभाव यावर भाष्य करत,(Police) या पिढीशी संवाद साधणं दिवसेंदिवस अधिक आव्हानात्मक होत असल्याचे मत व्यक्त केले.

विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, आजच्या तरुणांचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढला असून सतत मोबाईल आणि सोशल मीडियावर स्क्रोल करत राहिल्यामुळे त्यांच्या विचारप्रक्रियेवर परिणाम होत आहे. या सवयींमुळे बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासावर परिणाम होऊन व्यक्तीच्या मानसिक संतुलनात एक प्रकारचा “केमिकल लोचा” निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.त्यांनी सांगितले की, केवळ बौद्धिक क्षमता पुरेशी नसून भावनिक परिपक्वता, सामाजिक जाणीव आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची मानसिक ताकदही प्रत्येकामध्ये असणे गरजेचे आहे. (Police) आयुष्यातील अपयश, संघर्ष आणि तणावाला सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गेल्या काही दिवसांत देशभरात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांवर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या पार्श्वभूमीवर तरुण पिढीच्या मानसिकतेत होत असलेल्या बदलांकडे लक्ष वेधताना नांगरे पाटील म्हणाले की, आजच्या Gen Z पिढीपर्यंत योग्य विचार पोहोचवणे आणि त्यांच्याशी प्रभावी संवाद साधणे अधिक कठीण झाले आहे.तंत्रज्ञानाचा वापर टाळणे शक्य नसले तरी (Police) त्याचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात देशाची दिशा ठरवणारी हीच तरुण पिढी असल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन, मानसिक बळ आणि सकारात्मक मूल्ये देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?