पत्रकाराच्या कुटुंबाची निर्घृण हत्या; आई, वडील, भावावर कुऱ्हाडीनं वार, हत्याकांडानं खळबळ

रायपूर: पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्येची घटना ताजी असताना आणखी एका पत्रकाराच्या(Journalist) कुटुंबाची हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. छत्तीसगडच्या सुरजपूरमध्ये शुक्रवारी संपत्तीच्या वादातून पत्रकार संतोष कुमार टोपो यांच्या कुटुंबातील तीन जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

पत्रकार(Journalist) संतोष यांच्या आई, वडील आणि भावाची हत्या करण्यात आली. घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. त्यावेळी संतोष यांचे आई, वडील जगन्नाथपूरमधील खरगवातील शेतात काम करत होते. संतोष यांचं कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये बऱ्याच कालावधीपासून संपत्तीवरुन वाद सुरु होता.

शनिवारी संतोषचे कुटुंबीय आणि त्यांचे काका यांच्यात वाद झाला. या वादानं टोक गाठलं. त्यानंतर काकानं संतोषच्या आई, वडिलांवर धारदार हत्यारानं हल्ला केला. त्यात संतोष यांच्या आई, वडिलांचा जागीच मृत्यू झाला. आरोपीनं अतिशय निर्घृणपणे त्यांच्यावर कुऱ्हाडीनं वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. संतोष यांचे काका आणि अन्य संशयित नातेवाईकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून छापेमारी सुरु आहे.

जगन्नाथपूर गावात टोपो कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन आहे. त्यावरुन एकाच कुटुंबातील दोन गटांमध्ये वाद झाला. नरेश टोपो (३०) त्यांची आई बसंती टोपो (५५) आणि वडील माघे टोपो (५७) यांच्यासह वादग्रस्त जमिनीवर शेती करण्यास गेले होते. त्यावेळी दुपारी एकच्या सुमारास माघे टोपो यांच्या कुटुंबातील ६ ते ७ जण तिकडे पोहोचले.

शेती करण्यावरुन परिवारातील दोन गटांमध्ये वाद झाला. काही वेळातच भांडणाला हिंसक वळण लागलं. माघे टोपो यांच्या कुटुंबावर कुऱ्हाड आणि काठ्यांनी हल्ला केला. डोक्याला गंभीर इजा झाल्यानं बसंती टोपो आणि नरेश टोपो यांचा जागीच मृत्यू झाला. माघे टोपो यांनी गंभीर अवस्थेत अंबिकापूर वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माघे यांचा दुसरा मुलगा उमेश टोपोनं घटनास्थळावरुन पळ काढल्यानं त्याचा जीव वाचला.

हेही वाचा :

शॉपिंगसाठी तयार आहात ना? या दिवशी सुरू होतोय Flipkart चा Republic Day स्पेशल सेल!

‘महिनाभरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस येतील’, शिंदे गटातील मंत्र्याच्या दाव्याने खळबळ!

चाणक्यनीती! काय बघून पुरुषांजवळ येतात महिला? जोडीदाराच्या शोधात असाल तर… 

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जिनपिंग यांना आमंत्रण; PM नरेंद्र मोदींना का नाही?