वर्षाच्या शेवटी गुरू पुन्हा बदलणार चाल 3 राशींना मिळणार भाग्याची साथ

वर्षाच्या शेवटी गुरू ग्रहाच्या चालीत महत्त्वाचा बदल होणार असून तो वक्री होणार आहे. गुरूच्या या बदलाचा काही राशींवर शुभ प्रभाव पडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया, कोणत्या राशींना या काळात भाग्याची साथ मिळू शकते.

ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, शिक्षण, भाग्य, अध्यात्म आणि संततीचा कारक मानले जाते. (zodiac signs) त्यामुळे गुरूच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होत असल्याचे सांगितले जाते. वर्षाच्या शेवटी गुरू ग्रह पुन्हा एकदा आपली चाल बदलणार आहे. १३ डिसेंबर २०२६ रोजी गुरू सिंह राशीतच वक्री होणार असून, १३ एप्रिल २०२७ पर्यंत याच स्थितीत राहणार आहे. गुरूच्या या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडू शकतात. विशेषतः तीन राशींसाठी हा काळ अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया, कोणत्या आहेत या राशी.

ज्योतिषशास्त्रानुसार, एखादा ग्रह वक्री अवस्थेत असताना त्याच्या शुभ फळांची तीव्रता कमी होऊ शकते. गुरू ग्रह ज्ञान, शिक्षण, धर्म, अध्यात्म, भाग्य आणि विस्तार यांच्याशी संबंधित मानला जातो. (zodiac signs) त्यामुळे गुरू वक्री झाल्यावर व्यक्ती स्वतःच्या आयुष्याचा, निर्णयांचा आणि भविष्यातील योजनांचा अधिक विचार करू शकते. या काळात बाह्य गोष्टींपेक्षा आत्मचिंतन आणि स्वतःमध्ये बदल करण्याकडे कल वाढू शकतो.

कर्क: व्यवसायात चांगली प्रगती होईल. पूर्वी रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागतील. काही जुन्या व्यवहारांतून किंवा कामांतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि नशिबाची साथ मिळाल्याने कामांमधील अडथळे कमी होतील. ज्या क्षेत्रातील पुरेसे ज्ञान किंवा अनुभव नाही, अशा कामांमध्ये घाईने निर्णय घेणे टाळा.

कन्या: बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना या काळात सकारात्मक बातमी मिळू शकते. नवीन गोष्टी शिकण्याची आणि मोठे निर्णय घेण्याची इच्छा वाढू शकते. एखादी मोठी खरेदी करण्याचा किंवा भविष्यासाठी महत्त्वाची योजना आखण्याचा विचारही पुढे येऊ शकतो.

मीन: वैयक्तिक आयुष्यातील अडचणींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळेल आणि (zodiac signs) त्यावर उपाय शोधता येतील. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाईल. आयुष्यात आनंद देणाऱ्या काही चांगल्या गोष्टी घडू शकतात. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ उपयुक्त ठरू शकतो.

हेही वाचा : 

मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, मनसेत मोठा पक्षप्रवेश, मुंबईत घडामोडींना वेग

अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हुपरीमध्ये आगीत तीन घरे भस्मसात