कोल्हापुरकरांना सुनावलं, शेट्टींवर संताप; हिंदुस्तानी भाऊ अंबानींच्या समर्थनात

माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत हिंदुस्तानी भाऊंनी अंबानींच्या समर्थनात विधान केलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच, हिंदुस्तानी भाऊंवर सोशल मीडियावर(Media) टीकेचा वर्षाव होत आहे. 29 जुलै रोजी शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन मठातील हत्तीणी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील अंबानींच्या ‘वनतारा’ येथे पाठवण्यात आले. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. नुकताच, माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत हिंदुस्तानी भाऊंनी अंबानींच्या समर्थनात विधान केलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच, हिंदुस्तानी भाऊंवर सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून माझ्या इंस्टाग्राम आयडीला उडवण्यात आले होते. जेव्हा मी हिंदुत्त्वबद्दल बोलत असतो, तेव्हा काहींना त्याचा त्रास होतो. त्यामुळे, माझी आयडी उडवली होती(Media). मात्र, आजच मला माझी आयडी मिळाली. आज जेव्हा मी माझी इंस्टाग्राम आयडी ओपन केली, तेव्हा माझ्या निदर्शनात आले की कोल्हापुरच्या माधुरी हत्तीणीचे प्रकरण सुरू आहे. मग, मी माझ्या कोल्हापुरच्या मित्रांकडून तिची माहिती घेतली. मग, माझ्या लक्षात आले की, माधुरी हत्तीणीबाबत तर राजकारण सुरू आहे.

आता निवडणूका जवळ आल्याने हे राजकारण सुरू आहे. इतक्या वर्षांपासून राजकारण सुरू आहे, तेव्हा कोणी गेले होते का माधुरी हत्तीणीला पाहायला? तिची विचारपूस करायला? तिला काय हवं नको ते बघायला?’, असा सवाल हिंदुस्तानी भाऊंनी केला. पुढे, हिंदुस्तानी भाऊंनी आरोप केले की, ‘आता तिची अवस्था अशी आहे की, एक मुका प्राणी बोलू शकत नाही. त्याच्या पायाला त्रास होत आहे. तेथील लोक माधुरी हत्तीणीचा वापर करत होते. ज्याप्रकारे घोडा भाड्याने दिला जातो किंवा गाडी भाड्याने दिली जाते, त्याचप्रकारे या हत्तीणीला देखील भाड्याने दिले जात होते. माझ्याकडे काही पुरावे आहेत, जे मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हे लोक या हत्तीणीला भाड्याने देत होते आणि पैसे कमवत होते’.

‘2017 मध्ये, जैन समाजाचे एक स्वामीजी होते, ज्यांच्यावर माधुरी हत्तीनीने हल्ला केला होता. हे पत्र 22 डिसेंबर 2017 रोजीचे आहे. त्यानंतर, राजू शेट्टींनी 7 एप्रिल 2018 रोजी वन विभागाला पत्र लिहून म्हटले होते की, आम्ही त्याला आता सांभाळू शकत नाही. म्हणून, तुम्ही त्याला घेऊन जा. तुम्ही लोक, कोणाच्या तरी सल्ल्याने जे काही ऐकता, त्यांच्या जाळीत अडकू नका’, असं वक्तव्य हिंदुस्तानी भाऊंनी केले.’त्यानंतर, राजू शेट्टी यांनी 7 एप्रिल 2018 रोजी वन विभागाला पत्र लिहून म्हटले होते की, आम्ही त्याला आता सांभाळू शकत नाही. म्हणून, तुम्ही त्याला घेऊन जा. त्याने असे पत्र लिहिले होते.

तुम्ही लोक, कोणाच्या तरी सल्ल्याने जे काही ऐकता, हे राजकीय नेते. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. आता तुम्ही म्हणाल की कोणीतरी मला पैसे दिले किंवा अंबानींनी मला पैसे दिले, पण तसे नाही. अनंत अंबानी माझे घर सांभाळत नाहीत आणि तुमचेही नाही. त्यामुळे, तुम्ही गैरसमज करू नका. मी अनंत अंबानींंचा आदर करतो कारण तो एक कट्टर सनातनी आहे. ‘वनतारा’मध्ये 200 हून अधिक हत्ती आहेत. यासह, जगभरातील प्राणी आहेत. तुमच्या एका हत्तीशी त्याचा काय संबंध?’, अशी प्रतिक्रिया हिंदुस्तानी भाऊंनी दिली.

हेही वाचा :

निवडणूक प्रचाराचे फटाके आता दिवाळीनंतरच फुटणार
भावाने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडे का जाऊ नये? धार्मिक ग्रंथांमधून समोर आलं महत्त्वाचं कारण
भारतामधील तब्बल ९८ लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स बंद, तुमचे खाते तर नाही