वीकेंडच्या सकाळी काहीतरी खास आणि चटपटीत नाश्ता बनवण्याचा मूड असेल,(breakfast)तर पापड कोन ही परफेक्ट रेसिपी आहे! हा कुरकुरीत, हेल्दी आणि स्वादिष्ट नाश्ता तुमच्या सकाळी ताजेपणा आणि चव घेऊन येईल. पापड कोन बनवायला अत्यंत सोपे असून, कमी वेळेत तयार होतात. यात पापडाच्या कुरकुरीतपणासोबतच ताज्या भाज्या आणि मसाल्यांचा स्वाद एकत्र येतो, जो मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो.हा नाश्ता केवळ चविष्टच नाही, तर पौष्टिकही आहे, कारण यात तुम्ही हव्या त्या भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. पावसाळ्यात हलका आणि चटपटीत नाश्ता खाण्याची मजा काही औरच! चला, तर मग जाणून घेऊया हेल्दी पापड कोन कसा बनवतात.

पापड कोन बनवण्यासाठी(breakfast)लागणारे साहित्य
पापड
कांदा
फरसाण
कोथिंबीर
मीठ
तिखट

पापड कोन बनवण्याची कृती
पापड कोन बनवण्यासाठी सर्वात आधी पापड अर्धा कापून भाजून घ्यावा. (breakfast)नंतर त्याचा कोन बनवा. नंतर बारीक कांदा, टोमॅटो, शेंगदाने, फरसाण, कोथिंबीर,मीठ, तिखट सर्व एकत्र करा. नंतर पापडमध्ये सारण भरा. पापड कोन तयार आहे.
हेही वाचा :
भारतातील अनोखं मंदिर ज्याचे खांब हवेत लटकतायेत; कुठे आहे हे मंदिर? जाणून घेऊया यामागचं रहस्य
फुफ्फस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी
लॉर्ड्सवर मोहीम फत्ते करण्याची संधी; भारतीय महिलांचा आज इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना