दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा दणका, गोकुळनंतर वारणा दूध संघाची मोठी दरवाढ

कोल्हापूर दूध संघाने नुकताच 6 रूपयांची मोठी वाढ केली. त्यातच लोकांनी वारणा दूध खरेदी करण्यास सुरूवात केली. मात्र, आता वारण दूध संघानेही सर्वसामान्य लोकांना मोठा दणका दिला. तब्बल 6 रूपयांनी त्यांनी दूधाच्या किंमतीत वाढ केली.

कोल्हापूर दूध संघाची निवडणूक चर्चेत असतानाच गोकुळ दूध संघाने दूधाच्या भावात मोठी वाढ केली. ग्राहकांना मोठा दणका दिला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर गोकुळकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इतिहासामधील सर्वात मोठी दूध दरवाढ लागू करण्यात आली आहे. गोकुळने म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रति लिटरमागे 6 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांना एकाच वेळी अधिकचे 6 रूपये मोजावी लागली. खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही गोकुळच्या इतिहासामध्ये विक्री दरात केलेली सर्वत मोठी दरवाढ आहे. (Varana milk) यामुळे ग्राहकांना महागाईचा फटका बसला. गोकुळने या दरवाढी मागील कारणेही सांगितले. मात्र. एकाच वेळी सहा रूपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य लोकांच्या घराचे बजेट विस्कटणार स्पष्ट होते. गोकुळने आपली दरवाढ लागूही केली.

गोकुळने केलेल्या दरवाढीनंतर आता वारणा दूध संघानेही मोठा निर्णय घेतला. गोकुळनंतर वारणा दूध संघाने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दणका दिला. गोकुळनंतर वारणा दूध संघाच्या दूध विक्री दरात देखील मोठी वाढ करण्यात आली. वारणा दूध संघाकडून म्हशीच्या विक्री दरात सहा रुपयांची वाढ तर खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली.गोकुळ प्रमाणेत वारणाकडून ही दरवाढ करण्यात आली. गोकुळने केलेल्या दरवाढीनंतर अनेकांनी वारणा दूध खरेदीवर भर दिला. कारण गोकुळपेक्षा वारणा दूध स्वस्त मिळत होते. मात्र, वारणानेही लोकांना निराश केले. गोकुळनंतर वारणाकडूनही दरवाढ करण्यात आली. (Varana milk) त्यामुळे ग्राहकांना दूधासाठी सहा रूपये अधिकचे मोजल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.

गाईच्या विक्री दरात चार रुपयांची तर खरेदी दरात दोन रुपयांची वाढ केली आहे.(Varana milk) म्हशीसोबतच गायीच्या दूधाच्या दरातही वाढ करण्यात आली. आजपासूनच नवी दर वाढ लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे. गोकुळ सह वारणा डेअरीच्या म्हैस दुधाची कोल्हापूर परिसरात आता 78 रुपये प्रति लिटर दराने विक्री होणार आहे. महागाईचा मोठा फटका ग्राहकांना बसल्याचे यावरून दिसत आहे. थेट सहा रूपयांनी ही वाढ करण्यात आली.

हेही वाचा : 

दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं