शिवसेना कोणाची? ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात (Shiv Sena) सुप्रीम सुनावणी सुरु झाली आहे.

शिवसेना कोणाची? ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम सुनावणी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद सुरु केला आहे. आमदार अपात्रतेच्या मुद्यावर त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. सध्या सुरु असलेल्या सुनावणीत आमदार अपात्रता हा महत्वाचा मुद्दा आहे. (Shiv Sena) मागच्या दोन आठवड्यापासून सर्वोच्च न्यायालयात या खटल्याची नियमित सुनावणी सुरु आहे. सध्या ठाकरे गटाचे वकिल बाजू मांडतायत. पण एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वकिलांनी अजून युक्तीवाद सुरु केलेला नाही.
कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाचा मुख्य पॉइंट राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा हा आहे. विधिमंडळ पक्षाला आधार मानून विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने निर्णय दिला. (Shiv Sena) त्यामुळे हे निर्णय लागू होत नाहीत, ते बेकायदेशीर ठरतात असा ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद आहे. आता सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय घेणार? हे लवकरच समजेल. पण सर्वोच्च न्यायालयाचा या प्रकरणातील निर्णय ऐतिहासिक ठरु शकतो.
कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे
1 आमदार अपात्रता आणि पक्ष चिन्ह या दोन्ही वेगवेगळया गोष्टी.
2 निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा विधानसभा अध्यक्षांशी काय संबंध?
3 राजकीय पक्ष ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नव्हता.
4 1999 घटनेचा उल्लेख अद्याप फुटीर गटाने केलेला नाही. घटनेत मुख्यनेतेपदाचा कुठेही उल्लेख नाही.
5 आमदार अपात्रता निर्णयाशिवाय आयोगाने निर्णय घेणं चुकीच असल्याचं सिब्बल म्हणाले.
6 कोण आमदार, कुठे यावर प्रश्न असताना निर्णय घेणं चुकीच असल्याचं सिब्बल यांनी सांगितलं.
7 निवडणूक आयोगाने अपात्रता निर्णयाची वाट बघायला हवी होती.
8 विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला.
9 एकनाथ शिंदे यांचा व्हीप लागू होऊ शकत नाही.
10 बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावलेना प्रतोद बनवलं.
11 सुनील प्रभू यांची पक्षाकडून मूळ प्रतोदपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे शिंदेंचा व्हीप लागू होऊ शकत नाही.
12 पक्षाच्या घटनेत लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला?
13 अध्यक्षांनी जे केलं, ते त्यांच्या कार्यक्षेत्रात येतं का? असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलं.
14 फूट होण्यापूर्वीचं संविधान वापरल पाहिजे पण अध्यक्षांनी तसं केलं नाही.
15 गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोदपदी नेमलं, सिब्बल यांचा सवाल,
16 कपिल सिब्बल यांनी सुभाष देसाई केसचा दाखला दिला.
17 ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष
18 विलिन होणं ठीक पण पक्षांवर दावा करणं चुकीचं आहे.
19 गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते?
20 1999 साली पक्ष प्रतोदपद नव्हतं.
21 संख्यपेक्षेपक्षाची घटना आणि रचना महत्वाची आहे असं सिब्बल यांनी सांगितलं.
22 अध्यक्ष आंधळेपणाने निर्णय घेऊ शकत नाही.
हेही वाचा :
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ?
सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार?