चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे घडलेली एक घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या घटनेमुळे लातूर हादरलं आहे. चार वर्षांची निरागस चिमुकली(daughter) आरुषी बालाजी राठोड केवळ चॉकलेटसाठी हट्ट करते, आणि त्या क्षुल्लक कारणावरून तिला स्वतःच्या पित्याच्या हातून जीव गमवावा लागला. आरोपी बालाजी राठोड (३६) हा पळून जात असतांना पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दिनांकाच्या दुपारी चार वाजण्याच्या सुमारास, व्यसनाधीन असलेला बालाजी बाबू राठोड (वय 36) हा घरी होता. त्याची चार वर्षांची मुलगी(daughter) आरुषी हिने चॉकलेटसाठी हट्ट धरला. नशेत आणि रागाच्या भरात असलेल्या बालाजीला हा हट्ट सहन झाला नाही. रागाचा भडका उडालेल्या या बापाने जवळच असलेल्या साडीचा वापर करून आरुषीचा गळा आवळला. मुलगी गतप्राण होईपर्यंत त्याने फास सोडला नाही.

आरुषीची आई वर्षा राठोड घरी परतल्यावर तिला मुलगी हालचाल करत नसल्याचे दिसले. संशय आल्यावर तिने आरडाओरडा केला आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली. वर्षा यांनी तात्काळ उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. तपासांती हा गुन्हा बालाजीनेच केल्यास उघड झालं.

उदगीर ग्रामीण पोलिसांचे पथक माहिती घेत असल्याची खबर बालाजीला लागली आणि तो पळून जात होता. त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत बालाजी राठोडला पळून जात असताना अटक केली. सध्या त्याच्यावर बालहत्या, गळा दाबून खून, आणि महिलेस व कुटुंबियांना त्रास देण्याचे गंभीर आरोप ठेवले गेले आहेत.

माझ्या लेकराला त्याने मारून टाकले, त्याला फाशी द्या, त्याला असं सोडू नका. अशी आरुषीची आई वर्षा राठोड सातत्याने पोलीस ठाण्याला सांगत होती. आरुषीचे चुलते राजू राठोड यांनी हतबल होत कैफियत मांडली की, बालाजीने आम्हाला खूप त्रास दिला. वेगळं राहतो म्हणाला आणि घर वेगळे केलं. मला आणि आईला वाटणी मागत होता. बायकोबरोबर भांडत होता. मुलीला फाशी देऊन मारलं. सारखा आम्हाला मारतो, अशी धमकी देत होता. आज मुलीला मारून टाकलं आहे. असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

पहिल्या हिंदू व्यवसाय बंधू एकत्रीकरण बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोन्याच्या किंमतीत पुन्हा झाली घसरण!

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड