साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी समंथा रुथ प्रभू आणि (divorce)नागा चैतन्य घटस्फोटानंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांबद्दलचे अपडेट्स जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता ही बातमी समोर आल्यानंतर या जोडीचे चाहते खूप खूश झाले आहेत. घटस्फोटानंतर दोघांनी एकमेकांचे नाव घेणे देखील सोडले होते. मात्र, समंथा आजारी असल्याचे कळताच, नागाने तिला फोन केला. त्याने तिच्या तब्येतीची चौकशी केली. त्यामुळे आता असे म्हटले जात आहे की, निर्मात्यांनी या जोडीला नवीन प्रोजेक्टसाठी संपर्क साधला आहे. जर, दोघांनीही सहमती दर्शवली तर समंथा आणि नागाला पुन्हा एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे.

अभिनेत्री समंथाने काही काळापूर्वी आपण ‘मायोसिटिस’ नावाच्या आजाराशी लढा देत असल्याची माहिती दिली होती. अभिनेत्री या आजारावर उपचार घेत आहे. लवकरच समंथा रुथ प्रभू ‘यशोदा’ नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. आजारी असतानाही अभिनेत्री या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. (divorce)मात्र, यादरम्यान समंथा आणि नागा चैतन्य एका प्रोजेक्टसाठी एकत्र येत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. एका नव्या साऊथ चित्रपटासाठी निर्मात्यांनी त्यांना विचारणा केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप यावर दोघांकडून कोणतीची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
सध्या समंथा एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. अभिनेत्री तिच्या या आजाराच्या चर्चांमुळे सध्या प्रसिद्धी झोतात आली होती. दरम्यान नागा चैतन्यने तिच्या काळजीपोटी तिला फोन केला होता. (divorce)मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपली पूर्वाश्रमीची पत्नी समंथा प्रभू आजारी असल्याचे कळताच अभिनेता नागा चैतन्यने सगळे रुसवेफुगवे बाजूला सारत, तिची फोनवरून चौकशी केली. अभिनेत्याच्या या कृतीमुळे त्याचे खूप कौतुक झाले.
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांची भेट २०१०मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि हळहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. दोघांनी एकमेकांना डेट केले आणि तब्बल ७ वर्षांनी २०१७मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा :
इचलकरंजीत बसवेश्वर शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न
NEET Repeater विद्यार्थ्यांसाठी संधी – Aditya Tutorials कडून प्रवेश प्रक्रिया सुरू