शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर, नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली आहे. तसेच एकनाथ शिंदेवर देखील अनेक आरोप केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरण हे चांगलेच तापले आहे. या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर, नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली. (Shiv Sena) तसेच कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. आता या प्रकरणी खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत नरेश म्हस्के आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांची जी हत्या झाली आणि त्यानंतर मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे विरोधी पक्ष, सर्वजण एकत्र येऊन जो प्रयत्न केला जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभा झाली, विधानसभा झाली सर्वांनी एकत्र येऊन दोन आकडी संख्या सुद्धा विजय प्राप्त करु शकले नाहीत असे सर्वजण त्या प्रदीप पूर्णेकर यांच्या मृतात्माचा आधार घेऊन शिवसेनाला जो लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Shiv Sena) आतापर्यंत शिवसेनेच्या मार्फत झालेली हत्या त्या संदर्भातील वातावरण हे पाहून आम्ही संयमाची भूमिका घेतली. एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच दिवशी सीपींना फोन केला आणि जे कोणी हत्यारे असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे. पकडले गेले पाहिजे आणि पूर्णपणे त्या मृतात्म्याला न्याय दिला पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी भूमिका घेतली.
पुढे ते म्हणाले की, एसआयटी नेमली गेली आणि आरोपी पकडले गेले. परंतू त्या घटनेचा आधार घेऊन पहिल्या दिवसापासून शिवसेनाला आणि एकनाथ शिंदेंना लक्ष केले जात आहे. काल त्याचा अतिरेक झाला आहे. शिवसैनिक म्हणून आम्ही ते सहन करणार नाही. आरोपींना पाठिशी घालणार नाही. काल ज्यांनी आंदोलन केले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करणार. ठोशाचे उत्तर ठोशाने दिले जाणार. विरोधक यांना सांगायचे आहे आम्ही शिंदे यांचे शिवसैनिक आहेत.
नरेश म्हस्के म्हणाले की, उद्याच्या आंदोलनात चुकीचं वक्तव्य केलं तर तो नेता ठाण्यातून परत जाणार नाहीत. ही धमकी समजायची आहे तर धमकी समजा. (Shiv Sena) अनेक आगरी समाज शिवसेनेच्या मागे आहे. राजकारण करू नका. मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, ठाण्यात संजय राऊत,आदित्य ठाकरे आले…राजकारण केले. एकनाथ शिंदे यांनी पुर्णेकर कुटुंबियांच्या बाबत संवेदनशील आहेत. पोलिसाना देखील यावर कारवाईचे आदेश एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले आहे. एकनाथ शिंदे आमचे मुख्य नेते आहेत. राज्यात अनेक ठिकाणी शिंदे काम आहे. तुम्ही हजार लोक अनंत असेल तर आम्ही देखील लाखो लोक आणू शकतो. पण तसे राजकारण करत नाही. एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचे काम करू नये. जेष्ठ सरकारी वकील आम्ही देऊ.
हेही वाचा :
मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा
फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का काय होणार नेमका बदल