ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

चातुर्मास ६ जुलैपासून सुरू झाला असून हा हिंदू धर्मातील पवित्र काळ आहे.(hinduism) ज्यामध्ये अनेकजण मांसाहार, लसूण आणि कांदा टाळतात. अशा वेळी सात्त्विक आणि स्वादिष्ट पदार्थांची गरज भासते. जर तुम्ही पावसाळ्यात घरीच चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल, तर व्हेगन कबाब हा उत्तम पर्याय आहे. लसूण आणि कांदा न वापरता, घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्याने तुम्ही झटपट व्हेगन कबाब बनवू शकता. ही रेसिपी सोपी, आरोग्यदायी आणि घरातील सर्वांना आवडेल. चातुर्मासात सात्त्विक आहाराला प्राधान्य देताना, हे कबाब तुमच्या जेवणाला चव आणि पोषण दोन्ही प्रदान करतात. विशेष म्हणजे, यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि साहित्यही सहज उपलब्ध आहे. चला, जाणून घेऊया घरच्या घरी व्हेगन कबाब बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

लागणारे साहित्य(hinduism)
१. पालक – १ जोडी
२. कच्चे केळे – २ (उकडलेले आणि चिरलेले)
३. हिरवे वाटाणे – १ कप
४. हिरव्या मिरच्या – बारीक चिरलेल्या
५. कोथिंबीर – बारीक चिरलेली
६. पनीर – ५० ग्रॅम (चिरलेले, पर्यायी)
७. मीठ – चवीनुसार
८. जिरे पावडर – १ टीस्पून
९. आमचूर पावडर – १ टीस्पून
१०. गरम मसाला – २ टीस्पून
११. ओट्स – २ टेस्पून
१२. बेसन – १ टीस्पून
१३. तेल – गरजेनुसार
१४. काजू – थोडे
१५. चाट मसाला

कृती
सर्वात आधी पालक आणि कोथिंबीर गरम पाण्यात (hinduism)उकळा नंतर वेगळी काढा. नंतर मिक्सरमध्ये वाफलेला पालक, मटार, हिरवी मिरची बारीक करून घ्या. नंतर एका बाउलमध्ये केळी, पनीर,जीरा पावडर, गरम मसाला,आमचुर पावडरा आणि बारीक केलेले मिश्रण आणि पकड येण्यासाठी ब्रेड क्रम टाका आणि मळून घ्या.नंतर हाताला तेल लावून कबाब तयार करावे. नंतर गरम तव्यावर भाजून घ्यावे.

हेही वाचा :

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार

भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय

Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया! जाणून घ्या राइनोप्लास्टी केल्यामुळे त्वचेला होणारे फायदे