केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान केलेले भाषण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी उपस्थित नागरिकांना अधिक जोमाने घोषणा देण्याचे आवाहन केले. (Pune) यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरव करण्यात आला.

लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव पुण्यात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अमित शाह यांनी उपस्थितांना उद्देशून, “अरे पुणेकरांना काय झाले… असा आवाज चालणार नाही,” असे म्हणत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ची घोषणा अधिक जोरात देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. भाषणात अमित शाह यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्याच्या लढ्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केल्याचे सांगितले. (Pune) स्वातंत्र्य चळवळीत सर्वसामान्य जनतेला सहभागी करून घेण्याचे मोठे कार्य टिळकांनी केले, असे ते म्हणाले. गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारखे सार्वजनिक उत्सव सुरू करून त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची पायाभरणी केली आणि देशाला योग्य दिशा दिली, असेही शाह यांनी नमूद केले.
टिळकांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी अमित शाह यांनी पुढे सांगितले की, देश आजही लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर वाटचाल करत आहे आणि हा प्रवास थांबवणे शक्य नाही. टिळक हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर ते शिक्षक, निर्भीड पत्रकार आणि दूरदृष्टी असलेले विचारवंत होते. भारताचा आत्मा आणि विवेक समाजासमोर मांडण्याचे कार्य त्यांनी आपल्या लेखणीद्वारे केले, असेही त्यांनी सांगितले.यावेळी अमित शाह यांनी स्वतःला गुजराती भाषेत भगवद्गीता वाचण्याची प्रेरणा टिळकांच्या लिखाणातून मिळाल्याचा उल्लेख केला. संविधानाविषयी आदर आणि शिस्त ही राष्ट्रजीवनाची महत्त्वाची मूल्ये असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा गांधी देखील लोकमान्य टिळकांना ‘लोकमान्य’ म्हणून संबोधत असत, (Pune) याची आठवण करून देत त्यांनी आजच्या तरुणांनी टिळकांचे साहित्य अवश्य वाचावे, असे आवाहन केले.
हेही वाचा :
पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?