वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासाला योग्य असे उकडलेल्या रताळ्याचे हेल्दी चाट!

उपवास म्हटलं की लगेच मनात साबुदाणा, बटाट्याची भाजी किंवा फोडणीची पोहे अशा नेहमीच्या पदार्थांची यादी तयार होते. (occasion )पण यावेळी काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचंय ना? मग ही खास रेसिपी नक्की ट्राय करा ,चटपटीत रताळ्याचं चाट! ही डिश फक्त स्वादिष्टच नाही, तर आरोग्यदायीही आहे. रताळ्याचे पौष्टिक गुण, शेंगदाण्याची कुरकुरीत चव आणि चाट मसाल्याचा झणझणीत टच. लगेच लिहून घ्या ही सोपी रेसिपी.

साहित्य
रताळे – २ मध्यम आकाराची उकडून सोललेली
चाट मसाला
लिंबाचा रस – १-२ टेबलस्पून
सैंधव मीठ – चवीनुसार
तूप
शेंगदाणे – (occasion )भाजलेले
जिरे पावडर – चिमूटभर
डाळिंब

कृती
सर्वप्रथम रताळे उकडून सोलून मध्यम चौकोनी तुकड्यांमध्ये कापा.
एका मोठ्या बाऊलमध्ये हे तुकडे ठेवा.
गॅसवर कढई गरम करून त्यात तूप टाका.(occasion )त्यात रताळ्याचे तुकडे टाकून मध्यम आचेवर हलके शॅलो फ्राय करा.
फ्राय झाल्यावर ते पुन्हा बाऊलमध्ये काढा.
त्यात भरड कुटलेले शेंगदाणे, सैंधव मीठ, जिरे पावडर, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून छान एकत्र मिसळा.
आता तयार चाट एका सर्व्हिंग बाउलमध्ये काढा, त्यावर डाळिंबाचे तुकडे टाका.
गरमागरम आणि झणझणीत चाट लगेच खाण्यासाठी सर्व्ह करा.

हेही वाचा :