अनिकेत कोथळे याचा मृतदेह ज्या ठिकाणी नेऊन जाळला, त्या जागेबाबत सरकार पक्षाने न्यायालयात या खटल्याचा पुरावा म्हणून दाखल केलेला पंचनामा हा खोटा व बनावट असून त्यामध्ये अनेक गंभीर विसंगती, त्रुटी व विरोधाभास असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ॲड. प्रमोद सुतार यांनी कोथळे खून खटल्याच्या सुनावणीदरम्यान केला. पुढील सुनावणी २२ जून रोजी होणार आहे.

अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयात सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे सुनावणीमध्ये सहभागी झाले होते. (Panchnam) जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यावेळी उपस्थित होते. ॲड. प्रमोद सुतार यांचा युक्तिवाद पूर्ण झाला त्यांना ॲड. अर्जुन मठपती व ॲड. सीमा सुतार यांनी मदत केली.
ॲड. सुतार त्यांच्या युक्तिवादामध्ये म्हणाले, पंचनामा करण्यासाठी पंचांना बोलावले असल्याचे पत्र न्यायालयात दाखल नाही. जागा दाखविण्याचे कबूल केल्यानंतर अकरा मिनिटात घटनास्थळी पंच कसे पोहोचले. आरोपीने निवेदन देण्याअगोदर त्या घटनास्थळी सरकारी वाहन कसे पोहोचले, असे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले. घटनास्थळाचा पंचनामा व त्या संदर्भातील पुरावा शाबित करण्यास सरकार पक्ष अपयशी ठरला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. (Panchnam) त्यांचा युक्तिवाद अपूर्ण राहिला. दि. २२ जून रोजी त्यांचा पुढील युक्तिवाद सुरू होणार आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी – अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना सांगली शहर पोलिसांनी एका गुन्ह्यांमध्ये अटक केली होती. न्यायालयाने या दोघांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीत असताना दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री अनिकेत आणि अमोल या दोघांना उपनिरिक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, राहूल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला या पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती व त्यातच अनिकेतचा मृत्यू झाला. हा खून दडपण्यासाठी युवराज कामटे व त्याच्या साथीदाराने अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधूदुर्ग) येथे नेऊन जाळला होता. (Panchnam) तसेच अमोल भंडारे हा पोलिस कोठडीतून पळून गेल्याचा बनाव केला होता. याप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?