वळसंग (ता. जत) येथे शेतात मक्याची कणसे गोळा करण्यासाठी महिला मजुरांना घेऊन जात असताना ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून झालेल्या भीषण अपघातात निवृत्त मेजर सुरेश निवृत्ती चव्हाण (वय ५३) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सात महिला मजूर जखमी झाल्या असून, (accident) त्यापैकी दोघींची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींवर सांगली येथे, तर अन्य पाच महिलांवर जत येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवार, दि. ३ रोजी सकाळी ८ वाजता घडली.

अपघातात अनिता हाक्के, छाया काकासाहेब पाटील, सरुबाई चेळकर, विमल सूर्यवंशी, राजक्का बंडगर, सुनीता डोंबाळे आणि महादेवी सोलनकर (डोंबाळे) या महिला जखमी झाल्या आहेत. जखमींपैकी अनिता हाक्के, छाया पाटील यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सांगली येथे, तर अन्य पाच जखमींवर जत येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश चव्हाण यांचे शेत गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. (accident) त्यांच्या शेतातील मका काढण्याचे काम सुरू असून कणसे गोळा करण्यासाठी ते सात महिला मजुरांना घेऊन ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून (क्र. एमएच १० ईआर ५८४८) शेताकडे जात होते. यावेळी शेतातील बांधावरून ट्रॅक्टर जात असताना अचानक त्यांचा ताबा सुटला आणि जमिनीपासून सुमारे १५ फूट उंच असलेल्या बांधावरून खाली घसरत ट्रॅक्टरने तीन पलटी घेतल्या. ट्रॅक्टरचा पुढील भाग खाली गेल्याने चव्हाण यांनी तो पुन्हा वर आणण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरचा पुढील भाग वर आलाही; मात्र त्याचवेळी ट्रॅक्टरचे मोठे चाक बांधाखाली घसरल्याने पुन्हा ट्रॅक्टर उलटला. या भीषण अपघातात सुरेश चव्हाण यांच्यासह ट्रेलरमधील सात महिला मजूर जखमी झाल्या.
अपघातानंतर सुरेश चव्हाण उठून उभे राहिले. रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी महिला मजुरांना दुखापत झाली आहे का, अशी विचारपूस केली. महिलांनी त्यांना खाली बसवले. (accident) त्यांच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनीही मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघाताची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा :
स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम
कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड