कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
स्वातंत्र्य किंवा स्वतःची भूमी मिळाल्यापासून आजतागायत युद्धाच्या झळा सोसणारा, सतत युद्धसज्जतेत असलेला,युद्धजन्य परिस्थिती असणारा आणि प्रत्यक्षात युद्धात उतरणारा देश म्हणून इस्रायलची जगभर ओळख आहे. युद्धसदृश्य वातावरण असताना या देशात टेक्नेसेट अर्थात संसदेच्या निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या. (situation) पण तेथील जनतेने कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट कौल दिलेला नाही. त्रिशंकू अवस्था आहे आणि छोटासा अरब पक्ष किंग मेकर च्या भूमिकेत आहे.

बेंजामिन नेत्यानाहू की आयसेनकॉट यापैकी पंतप्रधान कोण होणार इकडे भारतासह पश्चिम आशियाचे लक्ष वेधून राहिले आहे. इस्रायल मध्ये युद्धाच्या विरोधात असणारा वर्ग मोठा आहे. तो अधून मधून रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतो पण तरीही तेथील जनतेने नेत्यांनाहू यांचे सर्वाधिक उमेदवार निवडून दिले आहेत. इसराइल हा भारताचा विश्वासू मित्र आहे. तो पाक विरुद्धच्या लढ्यात कायम भारताबरोबर राहिला आहे. अवकाश सुरक्षा कवच तेथूनच आपल्याला प्राप्त झाले आहे आणि भारतीय जनतेच्या मनातही त्या देशाबद्दल प्रेम आहे. (situation)आणि म्हणूनच तेथील निवडणूक निकालानंतर तेथे सत्ता कुणाची येणार याची उत्सुकता भारतीयांना आहे. नेत्यानाहू हे युद्धखोर असले तरी त्यांच्याच हाती देश सुरक्षित असल्याची भावना तेथील जनतेची आहे.
संसदेच्या एकूण 120 जागांपैकी नेत्यांनाहू यांच्या पक्षाने 53, विरोधी आयसेनकॉट यांच्या पक्षाने 48 आणि अरब पक्षाने 19 जागा जिंकल्या आहेत. आखाती अर्थात अरब देशांच्या मधोमध इस्रायल आहे. आणि हे सर्व अरब देश इस्रायलचे शत्रू आहेत. आणि खुद्द इस्राईलमध्ये मुस्लिमांचा आरंभ पक्ष आहे आणि तो ज्यांना पाठिंबा देईल त्यांची सत्ता येणार आहे. इस्राईलचे राष्ट्रपती आयझॅक हे सत्तेच्या काठावर असलेल्या दोन्ही गटाशी चर्चा करून एका गटात सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देतील. अर्थात सर्वात मोठा संख्याबळ असलेला पक्ष हा बेंजामिन नेत्यांनाहू यांचा असल्यामुळे त्यांनाच सत्ता स्थापनेसाठी बोलावले जाईल. तेव्हा अरब पक्ष कोणती भूमिका घेतो यावर बरच काही अवलंबून आहे. त्यांच्या काही अटी मान्य करून त्यांचा पाठिंबा घ्यावा लागेल किंवा अरब पक्ष सत्तेच्या बाहेर राहून पाठिंबा देऊ शकतो. अशी त्रिशंकू अवस्था भारतातही काही राज्यांमध्ये निर्माण झाली होती. इसराइल मध्ये अति धार्मिक समूह आहे आणि त्याला लष्करात भरती होण्यापासून सूट देण्यात आली आहे. हा सध्या तेथे कळीचा मुद्दा बनलेला आहे.
बेंजामिन नेत्यानाहू हे एकीकडे राजकीय समस्येमध्ये अडकलेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीच्या गडबडीत आहेत. दोघांच्याही तेथील निवडणूक कार्यालयाकडून बुधवारी म्हणजे दिनांक चार नोव्हेंबर रोजी अधिकृत निकाल अहवाल राष्ट्रपतींना दिला जाईल. दिनांक 10 नोव्हेंबर रोजी संसदेचे नवीन सभागृह अस्तित्वात आले असल्याची घोषणा राष्ट्रपती भवन कडून होईल. दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक जागा मिळवलेल्या बेंजामिन नेत्यांनाहू यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले जाईल. आणि सरकार बनवण्यासाठी त्यांना 28 ते 42 दिवसांचा अवधी दिला जाईल. गरज पडल्यास आणखी 14 दिवसांचा अवधी दिला जाईल. या अवधीत नव्या सरकारने संसदेत विश्वास संपादित करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर मात्र इस्रायल मध्ये विचित्र राजकीय स्थिती निर्माण होऊ शकते.
भारतीयांना नेत्यानाहू हे जवळचे वाटतात. मुंबईच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर इस्रायली लोक राहतात. (situation) त्यांना बेणे इस्रायली म्हणतात. ते भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत. बेंजामिन हे खास बेने इस्रायली लोकांशी संवाद साधण्यासाठी काही वर्षांपूर्वी मुंबईला आले होते. भारताच्या संरक्षण सिद्धतेमध्ये इसराइलचे योगदान मोठे आहे. त्यांनी भारताला दिलेली अवकाश सुरक्षा कवच प्रणाली किती प्रभावी आणि उत्तम दर्जाची आहे हे ऑपरेशन सिंदूर च्या निमित्ताने सिद्ध झाले आहे. आणि म्हणूनच इस्राईलमध्ये स्थिर राजकीय व्यवस्था प्रस्थापित व्हावी अशी भारताची इच्छा आहे.
हेही वाचा :
स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम
कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड