खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे गटाचे आमदार फुटण्याच्या चर्चांवर एका वाक्यात उत्तर दिले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा काही तरी मोठं करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा शिंदे यांच्या रडावर असल्याचे चित्र आहे. ठाकरेंचे १४ आमदारांना शिंदेंच्या शिवसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. (discussions) दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना आमदार फुटीवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुप्रिया सुळे यांनी एका वाक्यात दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आमदार फोडाफोडी, पक्ष फोडाफोडी याची आता आम्हाला सवय झाली आहे.”
मला असं वाटतं उटसूट.. परवा आता भोरला आंदोलन झालं थेट केसेस केल्या. अहो कष्ट करणारे शेतकरी आहेत. काळ्या मातीशी इमान राखणारा तुमचा आणि माझा अन्नाचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याला आंदोलन केले (discussions) म्हणून तुम्ही जेलमध्ये टाकतं. पण जो या राज्यात कुणाला फसवतो, पुण्यामध्ये चोऱ्यामाऱ्या करतो, ती कोयता गँग ही कशी सापडत नाही सरकारला. ज्यांनी मोठे गफले केले, गुन्हे केले त्यांना वॉशिंग मशीनमधून, ज्यांच्यावर ईडी-सीबीय होती त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून तुम्ही मंत्री करता. पण जे कष्ट करणाऱ्यांसाठी लढतात त्यांना जेल, कोर्ट केसेस. हा कुठला न्याय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंचे १४ आमदारांना शिंदेंच्या शिवसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिली आहे. (discussions) यापैकी ५ आमदारांना सरकारमध्ये चांगली खाती आणि मंत्रिपदे हवी आहेत, अशी माहिती मिळत आहे. तर काहींची महामंडळ अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्यावर पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे. नवरात्रीपूर्वी या आमदारांचा पक्ष प्रवेश झाल्यास ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?
राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?
एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?