पार्थ पवार-कायनात धार यांचं ठरलं कोण आहे पवार कुटुंबाची होणारी सून?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे युवा नेते पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, 29 जुलै रोजी पुण्यात त्यांचा कायनात धारसोबत साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Pawar family) काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह पार पडला होता. त्यानंतर आता पवार कुटुंबात आणखी एका शुभकार्याची तयारी सुरू झाली आहे.

रेवती सुळेंच्या लग्नात चर्चेत आली जोडी मुंबईत पार पडलेल्या रेवती सुळे आणि उद्योजक सारंग लखानी यांच्या विवाहसोहळ्यात पार्थ पवार यांची उपस्थिती विशेष चर्चेत राहिली. यावेळी त्यांच्या सोबत कायनात धारही दिसली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ आणि कायनात यांनी विवाहस्थळी एकत्र उपस्थिती लावल्याने त्यांच्या नात्याबाबत पुन्हा चर्चांना उधाण आले होते.लग्न सोहळ्यातील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबत विविध चर्चांना वेग आला आणि आता साखरपुड्याची बातमी समोर आल्याने त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

पवार कुटुंबाशी कायनात धारचे जवळचे संबंध कायनात धार ही केवळ कौटुंबिक समारंभातच नव्हे, तर पवार कुटुंबाच्या अनेक महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले आहे. (Pawar family) काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. याशिवाय पवार कुटुंबाच्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही कायनातची उपस्थिती सातत्याने दिसून आली आहे. कठीण काळातही कुटुंबासोबत कायनात धारने पवार कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणांबरोबरच कठीण प्रसंगातही साथ दिल्याचे बोलले जाते.

कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढावला असताना तिने बारामतीसह मुंबईत आयोजित शोकसभांनाही उपस्थिती लावली होती. (Pawar family) त्यामुळे पवार कुटुंबाशी तिचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कायनात धार ही मूळची हरियाणातील असून सध्या ती दिल्लीत वास्तव्यास असल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती पार्थ पवार यांच्यासोबत विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत होती. महाकाल मंदिरातील दर्शन असो किंवा कौटुंबिक समारंभ, अनेक ठिकाणी दोघांची एकत्र उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.आता 29 जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या साखरपुड्यामुळे या चर्चांना अधिकृत स्वरूप मिळणार असून, पवार कुटुंबातील आणखी एका नव्या नात्याची सुरुवात होणार आहे.

हेही वाचा :

बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?

अशैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर?

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाला दिसली भारताची ताकद : मोदी?