एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? धक्कादायक माहिती आली समोर?

आगामी काळात महाराष्ट्राचे राजकारण केंद्राच्या घडामोडींशी जोडले जाणार आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्याची शक्यता असल्याने राज्याच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण होईल. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे भाकीत मोठ्या नेत्याने केलं असून, चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे म्हटले आहे. राऊत यांनी राज्यातील आर्थिक गैरव्यवहारावरही गंभीर टीका केली आहे.

आगामी काळ देशाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा असा ठरणारा आहे. राज्याच्या राजकारणासाठीही आगामी काळ महत्त्वाचा होणार आहे. केंद्रात ज्या घडामोडी घडणार आहेत, (politics) त्याचा परिणाम थेट महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहे. म्हणजेच येत्या काळात महाराष्ट्र हे राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. येत्या काळात फडणवीस दिल्लीत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. फडणवीस दिल्लीत गेल्यास मग राज्याच्या राजकारणाची धुरा कुणाच्या हाती जाईल? असा सवाल केला जात आहे. भाजप सूत्रे आपल्या हाती ठेवेल की मुख्यमंत्री पदाची आस लावून बसलेल्या एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी देईल? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, राज्यातील एक बड्या नेत्याने शिंदे यांच्या बाबत मोठं भाकीत करून राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

ठाकरे गटाचे खासदार आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतची भविष्यवाणी केली आहे. येत्या काळात देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार आहेत. ते 2029मध्ये पंतप्रधानही होऊ शकतात. (politics) त्यामुळे राज्याची सर्व सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जातील. बावनकुळेच मुख्यमंत्री होतील. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातील आहेत. पण महाजन यांची प्रतिमा मलिन झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे जाण्याची शक्यता कमीच आहे, असं सांगतानाच एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीच, असा दावा संजय राऊत यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

शिंदे खासदार, आमदार फोडत आहेत. फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचंड पैसे आहेत. पैसे त्यांच्या दरेगावातला शेतामध्ये उगवत नाहीत. तो पैसे मिसिंग लिंक अडीच हजार कोटीचा, ओव्हर बजेट म्हणजे लुटलेले पैसे आहेत. (politics) अशा पैशातून आमदार आणि खासदार विकत घ्यायचे हे त्यांचे धोरण आहे, अशी टीका राऊत यांनी केली.अशा प्रकारची माणसं देशाला घातक आहेत. राजकारणाला नाही, देशाला घातक आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेची खेळ करणं हा एक आर्थिक दहशतवाद आहे. तुम्ही आजच महालेखापालांचा रिपोर्ट पाहिला असेल. त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक बेशिस्तवरती अत्यंत कठोर शब्दांमध्ये कोरडे ओढले आहेत. आर्थिक बेशिस्त अशीच चालत राहिली तर महाराष्ट्राला कोणी यापुढे एक रुपया सुद्धा कर्ज देणार नाही. आता हे तर विरोधी पक्षाने सांगितले नाही, महाराष्ट्राचे बदनामी आम्ही केली नाही. केंद्र सरकार यांचे महालेखापाल आहेत, त्यांनी बदनामी केली असेल महाराष्ट्राची तर देवेंद्र फडणवीस यांनी महालेखापालांना बघून घेतले पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र विषयी असं काही कसं म्हणू शकता, जरी ते सत्य असलं तरी असे मला त्यांना आता सांगायचे आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

हेही वाचा :

बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?

अशैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर?

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाला दिसली भारताची ताकद : मोदी?