‘त्या’ गोष्टीमुळे पारुपल्लीने आणि मी घटस्फोट…, अखेर सायनाने सगळं सांगून टाकलं!

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पती आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याच्यापासून विभक्त(divorced) होत असल्याची धक्कादायक घोषणा केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून ही माहिती शेअर केली. २०१८ मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडीने आता लग्नाच्या ७ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सायना केवळ तिच्या खेळासाठीच नाही, तर तिच्या कोट्यवधींच्या संपत्तीसाठीही ओळखली जाते.

आयुष्य आपल्याला वेगवेगळ्या दिशांना घेऊन जातं-
सायनाने रविवारी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाते. खूप विचारविनिमय केल्यानंतर, मी आणि पारुपल्लीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही एकमेकांसाठी शांती, प्रगती आणि दिलासा निवडत आहोत. या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.” सायना आणि कश्यप हैदराबादमधील बॅडमिंटन अकादमीमध्ये सरावाच्या दिवसांपासून एकत्र होते आणि १४ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी लग्न केले होते.

पद्मश्री, पद्मभूषण आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित सायना नेहवाल देशातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती अंदाजे ५ मिलियन डॉलर (सुमारे ४२-४५ कोटी रुपये) आहे. तिचे मासिक उत्पन्न सुमारे ३५-४० लाख रुपये असल्याचे म्हटले जाते. तिच्या कमाईमध्ये खेळातून मिळणाऱ्या बक्षिसांव्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंटचा मोठा वाटा आहे.

सायना अनेक मोठ्या कंपन्यांची ब्रँड ॲम्बेसेडर आहे, ज्यात योनेक्स, मॅक्स लाईफ, केलॉग्स आणि रसना यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती सुमारे ७५ लाख ते १ कोटी रुपये शुल्क आकारते(divorced). सायनाच्या मालकीची हैदराबादमध्ये एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. तसेच, तिच्या कार कलेक्शनमध्ये मिनी कूपर, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेंझ यांसारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

पडळकर व आव्हाड यांनी जे पेरलं तेच उगवलं….!

युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो….– प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे

परफेक्ट बायको होण्यासाठी सोप्या टिप्स; देवी पार्वतीकडून शिका 5 गोष्टी