नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये व्हीआयपी सुविधांची मागणी केल्याने पोलीस चक्रावले. पिझ्झा, मऊ गादी आणि मॉस्किटो रिपेलंट त्याने मागितलं आहे.

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचं कथित अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात 20 वर्षांच्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. मात्र लॉकअपमध्येही त्याचा माज कमी झाला नसून त्याने VIP ट्रीटमेंटची मागणी केली आहे. खायला पिझ्या हवा, झोपायला उशी आणि मऊ गादी हवी, लॉकअपमध्ये डास चावतात, (minor girl) त्यामुळे मॉस्किटो रिपेलंटची मागणी देखील त्याने केली आहे. 20 वर्षांच्या बीबीएच्या या विद्यार्थ्याच्या वागणुकीमुळे पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. लॉकअपमध्ये असताना, चौकशीत सहकार्य करण्याऐवजी आरोपीने लॉकअपमधील सुविधांबाबत तक्रारींचा पाऊस पाडला असून ‘व्हीआयपी’ दर्जाच्या सुविधांची मागणी सुरू केल्याने पोलिसही वैतगाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरूणाने त्या लॉकअपमधील अस्वच्छ भिंती, दुर्गंधीयुक्त शौचालय आणि डासांचा त्रास यावर आक्षेप नोंदवला आहे. (minor girl) त्याने पोलिसांच्या कस्टोडियल चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिला आहे. पीडित मुलीकडून ताब्यात घेतलेला मोबाईल आणि स्वतःच्या मोबाईलचा पासवर्ड देण्यासही त्याने स्पष्ट नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे डिजिटल पुरावे गोळा करण्यात तपास यंत्रणेला अडचणी येत आहेत. एवढंच नव्हे तर आरोपीने सुरुवातीला वैद्यकीय तपासणी आणि उपचारांनाही विरोध केला होता. मात्र अखेर मंगळवारी पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, आरोपी लॉकअपमध्ये अधिकाऱ्यांशी सतत वाद घालत असून, आपल्या कृत्यांसाठी, त्याने त्या अल्पवयीन पीडितेलाच जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. चौकशीदरम्यान विचारलेल्या अनेक प्रश्नांचं नीट उत्तर दिलं नसून तो बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचंही समोर आलं आहे.या आरोपीने मंगळवारी विशेष न्यायालयात पोलिसांविरोधात गंभीर आरोप केले.पोलिसांनी त्याच्या भाड्याच्या घरातून 70 हजार रुपये रोख रक्कम घेतली, त्याला मारहाण केली आणि त्याचे चष्मे व बूट परत दिले नाहीत, असा दावा त्याने केला आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी आरोपी स्वतःलाच इजा करून घेण्याचाही प्रयत्न करत आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी सांगितलं की, आरोपीला कायद्यानुसार आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र एखाद्या आरोपीने मऊ गादी, विशेष जेवण किंवा इतर चैनीच्या सुविधा मागितल्या, तर त्या देणे शक्य नाही. (minor girl) आरोपी चौकशीत सातत्याने अडथळे निर्माण करत असून सहकार्य करण्यास नकार देत आहे. त्याचे समुपदेशन सुरू आहे, असं त्यांनी नमूद केलं.दरम्यान, आरोपी स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी पोलिसांकडून त्याच्यावर 24 तास विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे.
हेही वाचा :
पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?
व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?