अभिजीत दिपकेंचा मोठा प्लॅन तयार सप्टेंबरमध्ये घेणार मोठा निर्णय?

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दोन दिवसीय बैठकीनंतर (meeting)त्यांनी पक्षाची भविष्यातील भूमिका, देशव्यापी जनसंवाद मोहीम आणि आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात पक्षाची पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवस चाललेल्या बैठकीत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दिपके म्हणाले की, 25 जुलै रोजी देशातील तरुणांनी मोठा संघर्ष करून सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत त्यांनी तो पक्षाचा मोठा विजय असल्याचा दावा केला. (meeting) गेल्या अनेक वर्षांत सरकारने निर्माण केलेली भीती आता संपुष्टात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी सप्टेंबर महिन्यात पक्षाच्या पुढील धोरणाची घोषणा केली जाईल, असे स्पष्ट केले. देशातील नागरिक आता विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. CJP ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर चालणारी संघटना असेल, असे सांगत त्यांनी देशभरातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर जनसंपर्क अभियान राबविण्याची घोषणा केली.

अभिजीत दिपके यांनी पक्षाची विचारधारा संविधानाशी जोडलेली असल्याचे सांगितले. संविधानातील मूल्यांवर विश्वास ठेवत लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांनुसार पक्ष कार्य करेल, असे त्यांनी नमूद केले. आगामी काळात नागरिकांशी थेट संवाद साधून (meeting) त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व्यापक दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.याशिवाय डिसेंबर महिन्यात देशभरात विशेष जनसंपर्क मोहीम राबविण्यात येणार असून तिला “क्या बोलती पब्लिक” असे नाव देण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे विविध राज्यांतील नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शिक्षण आणि बेरोजगारीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर पुरेशी चर्चा होत नसल्याची टीका करत, हे प्रश्न देशभरातील जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी CJP लोकांमध्ये जाऊन संवाद साधणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?

व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?

आग लागली तपासाचा धूर दिसेना?