85 वर्षाचा जाणता राजा मैदानात, शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय आता थेट

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, 85 वर्षीय शरद पवार रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून काही उपाययोजना केल्या असल्या तरी, सरकारच्या निष्क्रियतेवर पवारांनी बोट ठेवले आहे.

राज्यात प्रचंड मोठा दुष्काळ पडला असून राज्य सरकारनेही दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारने दुष्काळ निवारणासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. तसेच दुष्काळ निवारणासाठी उपाय योजनाही केल्या आहेत. जनावरांच्या चारा पाण्याचीही व्यवस्था केली आहे. (Sharad Pawar) तसेच केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये अग्रिम मदत देण्याचंही जाहीर केलं आहे. ही मदत याच आठवड्यात दिली जाणार आहे. मात्र, राज्यातील दुष्काळ हा अत्यंत भीषण असल्याने बळीराजांचे अश्रू पुसण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. वयाच्या 85 व्या वर्षी शरद पवार रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळ दौरा करणार आहेत. पवार हे दिवाळीच्या आसपास दुष्काळी भागांची पाहणी करणार आहेत. तसेच दुष्काळी भागात परिस्थिती पाहून शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहेत. (Sharad Pawar) तसेच दुष्काळातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार आहेत. त्यामुळे पवारांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पवारांसोबत राष्ट्रवादीचे नेतेही असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात एवढा मोठा दुष्काळ पडला तरी राज्य शासन ग्राऊंड लेव्हलला एवढं अ‍ॅक्टिव्ह नाहीये, असं शरद पवार यांचं निरीक्षण आहे. शेतकरी जनावरे विकायला लागले आहेत. शेतकऱ्यांनी शहराकडे पलायन करायला सुरुवात केली आहे. घरंदारं सोडून, मुलांचं शिक्षण सोडून शेतकरी शहराकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार दौरा करून सरकारशी सल्लामसलत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Sharad Pawar) दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल कॅबिनेटची बैठक झाली. यावेळी दुष्काळावर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी याच आठवड्यात शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले. तसेच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात गेल्यावर ते कापून घेऊ नका. तसे आदेशच बँकांना द्या, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर, दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचीही काल बैठक झाली. यात अजून काही तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्गातून चारा घेऊन दुष्काळी भागांना उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

हेही वाचा : 

मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा

फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का काय होणार नेमका बदल

गळवेवाडीत आर्थिक वादातून कुटुंबास मारहाण