राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल, मुंबई अध्यक्षपदी युवा नेत्याची वर्णी

राज्यात विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू असताना एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. (political) राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पार्थ पवार यांनी मुंबईतील एका युवा नेत्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिदिक्की यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फेरबदलावर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रिक्त पदांवर नियुक्त्या करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आमदार झिशान सिद्दिकी यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.(political) तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते उमेश पाटील यांची राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झिशान सिद्दिकी आणि उमेश पाटील यांनी नियुक्ती पत्र देण्यात आले.

झिशान सिद्दिकी हे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचं पुत्र आहेत. त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसकडून वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयी होत ते आमदार झाले होते. त्यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपद देखील सांभाळले होते. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. (political) त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण शिवेसेना नेते वरुण सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेवर पाठवले.

हेही वाचा : 

मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा

फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का काय होणार नेमका बदल

गळवेवाडीत आर्थिक वादातून कुटुंबास मारहाण