महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्स आणि उपहारगृहांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. या कारवाईनंतर खाद्यपदार्थ तयार करण्याच्या पद्धतीतही काही बदल होताना दिसत असल्याचं चित्र आहे.

चायनीज पदार्थांना आकर्षक लाल रंग देण्यासाठी यापूर्वी अनेक ठिकाणी कृत्रिम रंगांचा वापर केला जात असल्याची चर्चा होती. मात्र, FDAच्या कारवाईनंतर कृत्रिम रंगांचा वापर टाळून चायनीज पदार्थांना रंग देण्यासाठी बीट आणि लाल मिरचीसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केला जात असल्याचं समोर येत आहे. (Food and Drug) त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा परिणाम खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर होत असल्याचं बोललं जात आहे.
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचं केवळ सर्वसामान्यांकडूनच नव्हे, तर मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकारांकडूनही कौतुक करण्यात आलं आहे. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. केदार शिंदे यांनी घरी मागवलेल्या चायनीजचा अनुभव सांगताना मिश्किल अंदाजात तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा उल्लेख केला.केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत, “आज घरी हॉटेलमधून चायनीज मागवलं… एवढंच वाटलं, ‘तुका’ म्हणे चायनीज ऐसेची खावे… रंग नाही हो! एकदम निरमा इफेक्ट…” अशा आशयाची मिश्किल टिप्पणी केली. या पोस्टमध्ये त्यांनी तुकाराम मुंढे यांनाही टॅग केलं. (Food and Drug) त्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली असून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
तुकाराम मुंढे यांच्या कामाचं यापूर्वी अभिनेत्री ईशा तलवार आणि देवोलीना भट्टाचार्जी यांनीही कौतुक केल्याचं सांगितलं जात आहे. (Food and Drug) दरम्यान, FDAच्या कारवाईची व्याप्ती सेलिब्रिटींपर्यंतही पोहोचली आहे. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीच्या संदर्भात अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्यासह काही सेलिब्रिटींना FDAकडून नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा झाली होती.एकूणच, अन्नपदार्थांमधील भेसळ आणि नियमबाह्य पद्धतींविरोधातील कारवाईमुळे तुकाराम मुंढे चर्चेत आले आहेत. त्यांच्या कारवाईमुळे हॉटेल आणि खाद्य व्यवसाय क्षेत्रात नियमांचे पालन करण्याबाबत अधिक जागरूकता निर्माण होत असल्याचं चित्र दिसत आहे.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?