रेल्वे पटऱ्या उखडू, विमानतळं उखडू, त्या निर्णयावर मनोज जरांगे संतापले, आंदोलनाबाबत सरकारला थेट इशारा?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा घेरलं आहे. अंतरवाली सराटीत 29 ऑगस्टपासून आंदोलनाची हाक देण्यात आली असली तरी जरांगे पाटलांचा रोख हा मुंबईकडे जाण्याचा आहे. (Manoj Jarange) यावेळी जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला.

रामनाथ ढाकणे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांचे तीन दिवसानंतर अंतरवाली सराटीत आंदोलन होत आहे. सरकारचे शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेले होते. पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. चर्चा निष्फळ ठरली. 29 ऑगस्टपासून जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची हाक दिली आहे. (Manoj Jarange) अंतरवाली सराटीत जरी आंदोलन होणार असले तरी त्यांचे लक्ष हे मुंबईकडे आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलकांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. या नवीन धोरणावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. मंत्रालय, फोर्ट आणि लोकलवरील ताण लक्षात घेत. मागील आंदोलनाचा अनुभव लक्षात घेत यावेळी बृन्हमुंबई पोलीस आयुक्तांनी कडक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आझाद मैदानावरच आंदोलन करता येईल. याव्यतिरिक्त सभा, मोर्चे, धरणे घेण्यास मनाई करण्यात आली आहे. आंदोलनासाठी एकच दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. त्यावरून जरांगे पाटील भडकले आहेत. दादागीरी करायची नाही. आम्ही आझाद मैदान, शिवाजी पार्क, वर्षापुढे सर्वच कडे आंदोलन करणार आहोत. जिथे रोड दिसेल तिथे आंदोलन कऱणार. तुम्ही काय करताय ते बघु? मग आम्ही तुमच्या रेल्वे ही फिरु देणार नाही आणी विमानही उडू देणार नाही. सर्व रेल्वेच्या पटऱ्या उखडून टाकणार. सर्व विमानतळ उखडून टाकणार असा इशारा त्यांनी दिला.

दक्षिण मुंबईतील आंदोलनांसाठी राज्य सरकारने नवे नियम लागू केले आहेत. आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास मनाई केली आहे. मराठे मुंबईत जाणार आहे त्यामुळे मुद्दामून सरकारने हे केलं, यात झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही. सरकार विरोधात रोज यामुळे जात आहे, लोकांनी यांना सत्तेवर बसवले मराठ्यांनी यांना सत्तेवर बसवले. त्याच गोरगरीब मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखणं म्हणजे रोष वाढण्याचे कारण फक्त सरकार आहे. तुमच्या कायदा हातात आम्ही देतो सत्ता आम्ही तुमच्या हातात देतो आणि तुम्ही त्याचा गैरवापर करता. लोक (Manoj Jarange) यासाठी तुम्हाला निवडून देतात की आपण कसले परिस्थितीत मुंबईला जर गेलो आपलं सरकार तिथे आहे आपले फडवणीस आपले शिंदे आपले दादा बसले तिथे. जे आपले म्हणून बसवले तेच मुंबईत येऊ नका म्हणतात, ही खूप मोठी दहशत झाली. ही सरकारची दादागिरी झाली ही चालत नसते, असा सज्जड दम त्यांनी दिला.

आम्ही मोजत नसतो आणि ऐकतही नसतो आम्ही कायद्याचा सन्मान करतो, आम्ही तुम्हाला परवानगीचा अर्ज दिला आहे. तुम्ही परवानगी द्या नाहीतर नका देऊ. मी जात असतो ठरलं आमचं द्यायचं मी जाणार रात्रंदिवस बसणार तुम्ही काय करणार ते आम्ही बघणार, तुम्ही मुंबईत कसे अडवतात हे पण बघतो. तुम्हाला मुंबईत अडथळा नको तर आमचे प्रश्न सोडवा, तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही सत्तेतही बसायचं नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.मुंबईतील बांधवांनी समजून घ्या, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का तर एखाद्या वेळेस नक्की होईल आम्हाला दहा-पंधरा दिवस सांभाळून घ्या. आम्ही तुमचेच आहे लोकाचे नाही. मुंबईत कोणीच सुखी नाही ,आम्ही त्यांना नीट करायला यायला लागलो. जर ठरलं तर मुंबईत येणार वर्षावरच येणार ,तुमच्या बापाची पेंड आहे का इकडे येऊ नको तिकडे येऊ नको म्हणायला ,असा संताप त्यांनी व्यक्त केला. अशा नोटीसा पाठवणं म्हणजे लोकांवर जुलूम नाही का , असा सवाल जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?

नशामुक्त सांगलीसाठी संकल्प करा?