निक जोनसने लेक मालतीचा क्युट व्हिडीओ शेअर(Share) केला आहे. ज्यात ती वडिलांचे कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसत आहे.बॉलिवूड आणि हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्रियांका चोप्राने 2018मध्ये निक जोनससोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांना गोंडस मुलगी आहे. जिचे नाव मालती असे आहे. प्रियांका कायम मालतीसोबतच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा खट्याळ स्वभाव आणि क्युट लूकचे नेटकरी दिवाने आहेत. नुकताच निकने मालतीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जोनस ब्रदर्सच्या एका कॉन्सर्टला मालती गेली होती. तेव्हा ती आपल्या वडिलांचे कॉन्सर्ट खूप एन्जॉय करताना पाहायला मिळाली. या गोड क्षणाचा फोटो निकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. निक जोनस स्टेजवर उभा राहून परफॉर्मन्स देत होता. तेव्हा मालती आपल्या क्युट अंदाजात वडिलांना कॅमेरात कैद करताना दिसत आहे. मालती कॅमेरामधून निकचा व्हिडीओ काढताना दिसत आहे. निकने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
नेटकरी कमेंट्समध्ये मालतीच्या क्युट अंदाजचे कौतुक करत आहेत. पांढऱ्या-काळ्या कोर्ड सेटमध्ये मालती खूप सुंदर दिसत होती. प्रियांका चोप्रा, निक अनेक वेळा आपली लेक मालतीसोबत स्पॉट होतात. तेव्हा तिच्या क्युट क्षणांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे हे प्रेक्षकांचे आवडते कपल आहे. प्रियांकाचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.
प्रियांका चोप्रा अलिकडेच ‘हेड्स ऑफ स्टेट ‘ चित्रपटात पाहायला मिळाली. तसेच प्रियांका चोप्रा एसएस राजामौलीच्या SSMB29 चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांका चोप्रा साऊथ अभिनेता महेश बाबूसोबत झळकणार आहे. SSMB29 चित्रपट ॲक्शन आणि ॲडव्हेंचरचा धमाका असणार आहे. चाहते देखील या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.
हेही वाचा :
“इंजेक्शन घेतलंस का रे तू?” शुभमन गिल आणि आकाश दीप यांच्यातील संवाद स्टंप माइकमध्ये कैद
संतापजनक! शाळेत जात असतांना बळजबरीने गाडीत बसवलं, विनयभंग केला, पाईपने मारहाण केली
विराटसोबतच्या अफेअरचा विषय निघताच तमन्नानं सगळं सांगितलं… लग्नाबद्दल म्हणाली…