राहुल गांधींचा पोलिसांवर गंभीर आरोप थेट पोलीस स्टेशनबाहेरच मांडला ठिय्या?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पॅलेट गनच्या वापराच्या प्रकरणावरून पोलिसांकडे थेट दाद मागितली आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचताना त्यांनी या कारवाईत जखमी झालेल्या साहिल लोहबच यालाही सोबत घेतले. गुन्हा नोंदवला जात नसल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. (Rahul Gandhi) समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याचं प्रकरण सध्या तपासात आहे. या कारवाईची चौकशी नेमकी कोणत्या टप्प्यावर पोहोचली आहे, याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात गेले. (Rahul Gandhi) यावेळी त्यांनी पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या साहिल लोहबच याला देखील आपल्या सोबत नेलं. राहुल गांधी जवळपास अर्धा तास पोलीस ठाण्यात उपस्थित होते.

या भेटीत त्यांनी पोलिसांसमोर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. संबंधित विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात यावं आणि त्यांची तक्रार अधिकृतपणे नोंदवून घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, या प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पोलिसांकडून पॅलेट गनच्या वापराबाबत तपासाची ठोस माहिती मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. अखेर पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर त्यांनी जखमी तरुणासह तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केलं.

पोलिसांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राहुल गांधी यांनी आपली भूमिका आणखी आक्रमक केली. जोपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याबाहेरून उठणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्यासोबत साहिल लोहबच यानेही ठिय्या दिला आहे. राहुल गांधी यांच्या आंदोलनामुळे संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी जमा झाली आहे. पॅलेट गन कारवाईचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या पॅलेट गन कारवाईची सर्वोच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. (Rahul Gandhi) त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सीबीआयच्या माजी अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तपास कोणत्या मुद्द्यांवर करायचा, यासाठी न्यायालयाने आवश्यक मार्गदर्शक तत्त्वेही निश्चित केली असून चौकशी निष्पक्षपणे करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा :

शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

RBI च्या नव्या नियमांमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार?

दहा मीटरच काय, दहा इंचही जागा देणार नाही?