“साखर दरवाढीतून कारखानदार, व्यापारी २२ हजार कोटींचा नफा कमावणार”, राजू शेट्टींचे धक्कादायक विधान?

भाजप सरकारमधील सक्रीय राहिलेले काही मूठभर साखर कारखानदार व साखरेचे व्यापारी यांच्या भल्यासाठी ही सर्व मंडळी देशात कृत्रिम साखरेचा तुटवडा करून साखरेचे दर वाढवू लागले आहेत. मोजके साखर व्यापारी व साखर कारखानदारांच्या हितासाठी १५० कोटी जनता व ऊस उत्पादक शेतकरी वेठीस धरले जात आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केला. (Raju Shetty) तसेच त्यांनी, पुढील तीन महिने अशाच पध्दतीने साखरेचे बाजारभाव वाढत राहिल्यास या खप होणाऱ्या साखरेत मूठभर कारखानदार व व्यापारी मिळून जवळपास २० ते २२ हजार कोटी रूपयाचा नफा कमविला जाणार असल्याचे धक्कादायक विधान केले आहे.

देशामध्ये साखरेचे दर सातत्याने वाढत चालले आहे या संदर्भात बोलताना माजी खासदार शेट्टी म्हणाले की, देशात साखरेचा दर शेअर बाजारातील निर्देशांक पेक्षाही जादा वेगाने उसळी घेऊ लागला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आगामी हंगाम सुरू होणार आहे. मात्र देशात पुरेल एवढा साखर साठा केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने पूर्वीच नियंत्रित केला आहे. ॲागस्ट , सप्टेंबर व ॲाक्टोंबर या तीन महिन्यांत सरासरी ६५ ते ७० लाख मेट्रिक टन साखरेची खप होणार आहे.(Raju Shetty) याचाच अर्थ देशातील एकूण उत्पादनाच्या २५ ते ३० टक्के साखर या तीन महिन्यात बाजारात विकली जाणार आहे.

देशातील प्रत्येक साखर कारखान्यात किती साखर साठा शिल्लक आहे याची समोर. आकडेवारी केंद्र सरकारकडे कारखानानिहाय उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या आदेशाने तातडीने सर्व कारखान्यावर छापा टाकून पुरवठा विभागाने शिल्लक साखर साठा तपासला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.सध्या कारखान्यात जी शिल्लक साखर आहे त्या व्यतिरिक्त असणारी साखर कारखान्याकडून कमी दराने खरेदी केलेली व काटामारी तसेच उतारा चोरीची आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार कारखान्यांकडे शिल्लक साखर साठ्याचा व बाजारातील दराचा विचार केल्यास अशाच पध्दतीने पुढील तीन महिने हा दर राहिल्यास देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी १ हजार ते १२०० रूपये दुसरा हप्ता देणे सहज शक्य आहे.

मात्र कृत्रिम तुटवडा करून स्वतःच्या फायद्यासाठी तेजीत साखर विक्री करून आणि यामुळेच भविष्यात दर नियंत्रणात ठेवण्याच्या नावाखाली साखर आयात करून पुढील हंगामातील सुरवातीस साखरेचा पुन्हा ३२ ते ३५ रुपयांपर्यंत दर कमी होण्याचा धोका दिसू लागला आहे. (Raju Shetty) तीन महिन्या पूर्वी साखरेचा दर प्रति क्विंटल ३८०० रुपये तर मागील आठ दिवसांपूर्वी हा दर ४५०० रुपये होता. आता तो दर ७ हजार रूपये झाला आहे. या दरवाढीसाठी केंद्र सरकार मधील कोणत्या बड्या नेत्याचा राजकीय आशीर्वाद आहे हे बघणे महत्वाचे ठरेल, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा :

शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

RBI च्या नव्या नियमांमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार?

दहा मीटरच काय, दहा इंचही जागा देणार नाही?