राज्यात पावसाचा इशारा, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

मुंबईकरांसाठी हवामान विभागाने तातडीचा इशारा जारी केला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा(Rain) जोर कायम असून, पुढील चार तास अत्यंत धोकादायक असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रात्रीपासूनच वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून, अनेक सखल भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

ठाणे, पालघर आणि रायगडच्या काही भागांमध्ये देखील रात्रीपासून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने नागरिकांना शक्यतो घरातच थांबण्याचा सल्ला दिला असून, बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

24 ते 27 जूनदरम्यान पावसाचा जोर :
भारतीय हवामान विभागाने 24 ते 27 जून दरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज जाहीर केला आहे. या कालावधीत पावसाचा intensity कमी-जास्त होत राहणार असून, विशेषतः 24 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर 25, 26 आणि 27 जूनला पाऊस मध्यम स्वरूपाचा राहण्याचा अंदाज आहे.

मुंबईत दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाने(Rain) हजेरी लावल्यामुळे सामान्य नागरिकांसह कार्यालयीन कामावर जाणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. पाणी साचलेल्या रस्त्यांवर वाहतूक अडथळलेली असून, लोकल गाड्याही 10-15 मिनिटं उशिराने धावत आहेत.

घराबाहेर पडताना नियोजन गरजेचे :
मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाचा जोर लक्षात घेता, घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य नियोजन करणं अत्यावश्यक आहे. शक्य असल्यास लवकर निघावं, सोबत कोरडे खाण्याचे पदार्थ आणि पाणी ठेवावं, जेणेकरून कुठे अडकण्याची वेळ आली तरी अडचण होणार नाही. हवामानात सौम्य गारवा जाणवत असून, सततच्या पावसामुळे वाहतुकीवर आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.

मुंबईकरांसाठी हा आठवड्याचा सुरुवातीचा काळ अधिक सावधतेचा असून, पुढील दोन दिवसांत काही भागांत मुसळधार पावसाची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवावे.

ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा धोका :
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी 24 व 25 जून हे दिवस अधिक धोका निर्माण करणारे असणार आहेत. ठाण्यात काही भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. 26 जून रोजीही पावसाचा जोर कायम राहणार असून, 27 जूनपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

पालघरमध्ये 24 जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस(Rain) होईल. 25 तारखेला काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. 26 व 27 जूनला मात्र पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरुवातीच्या दोन दिवसांत विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! 1 जुलैपासून पेट्रोल-डिझेल मिळणार नाही

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; NPS आणि UPS योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

क्रिकेट विश्वात शोककळा, माजी भारतीय फिरकी गोलंदाजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन