कोल्हापूरचा विकास रखडल्याने राजेश क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा ठाकरेसेनेची मागणी?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बारा वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर शहराच्या विकासाचा एकही प्रश्न धडपणे सोडवलेला नाही. कोल्हापूर शहरातील नागरी व विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिल्याने शहराची दुरावस्था होऊ लागली आहे. (Rajesh Kshirsagar) यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला असल्याने राजेश क्षीरसागर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

यावेळी संजय पवार यांनी राजेश क्षीरसागर यांच्या विकास कामांच्या दाव्याचा पंचनामा केला. कोल्हापूर शहरासाठी १०० कोटीच्या रस्ते प्रकल्पातील किती रक्कम खर्च झाली, त्याची काय अवस्था आहे, (Rajesh Kshirsagar) याचे उत्तर राजेश क्षीरसागर यांनीच द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील कसबा बावडा ते वडणगे पूल दहा वर्षापासून प्रलंबित राहिला आहे. कोल्हापुरातील झूम कचरा प्रकल्पाचा प्रश्न पंधरा वर्षानंतरही उग्र स्वरूप धारण करून आहे. कोल्हापूरचे जल वैभव असलेल्या रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यात ते अपयशी ठरले आहेत. जयंती नाल्याच्या प्रदूषणाचा तसेच पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न जैसे थे राहिला आहे. कोल्हापूर शहरातील अतिक्रमणे वाढत चालली आहे. वाहतुकीचे नियोजन कोलमडलेले आहे, अशी टीका करून त्यांनी यास राजेश क्षीरसागर जबाबदार असल्याचा आरोप केला.

महालक्ष्मी मंदिरातील भक्तनिवास,ध्वनीयुक्त खांब, बॉटनिकल गार्डन हे प्रश्न सुटलेले. याबाबत क्षीरसागर यांनी लोकांचे समाधान केलेले नाही. या सर्व कामावर कोट्यावधी रुपये खर्च झाले असले तरी एकही काम दर्जेदार झालेले नाही, अशी टीका त्यांनी केली. शाहू मिल मध्ये राजर्षींचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मारक करणार असल्याचे सांगितले जाते. परंतु या मिलच्या संरक्षण भिंती पडू लागल्या आहेत तरी त्याकडे आमदारांनी लक्ष दिलेले नाही. महापालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम केले असले तरी महापालिकेला मिळणारी अनुदानित रखडले आहेत. ही जबाबदारी आमदार म्हणून क्षीरसागर यांनी पार पाडलेली नाही. शाम सोसायटीतील सांडपाणी रोखले असते तरी रंकाळा तलावाचे प्रदूषण थांबले असते. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील औषध घोटाळ्यातील ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु हाच ठेकेदार राजेश क्षीरसागर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जाहिराती प्रसिद्ध कसा करतो, असा प्रश्न संजय पवार यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर शहरातील सिंगापूर केल्याचा दावा आमदार राजेश क्षीरसागर करीत आहेत. सिंगापूर नव्हे तर कोल्हापुरात युरोपच तयार झाले आहेत, असा उपहासात्मक उल्लेख करून संजय पवार यांनी कोल्हापूरकर हो, पारपत्र काढू नका, सिंगापूरच काय तर तुम्हाला युरोप कोल्हापुरातच पाहायला मिळेल, असा टोला लगावला. विजय देवणे यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा १४३० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात अत्यल्प निधी मिळालेला आहे. मंदिरातील गरुड मंडपाचे काम चार वर्षापासून सुरू असून त्यामध्ये दोष निर्माण झालेले आहेत. विकास कामाच्या नावाखाली कोल्हापुरात चोरांची टोळी निर्माण झाली आहे, अशी टीका त्यांनी केली. (Rajesh Kshirsagar) यावेळी जिल्हाप्रमुख विराज पाटील, नवेज मुल्ला, मनजीत माने, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत मांढरे उपस्थित होते.

हेही वाचा :

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल? सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं?

ट्रम्प टॅरिफमुळे महाराष्ट्र राज्यासमोर नवे आव्हान?

मिरज पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कोंडले?