सकाळच्या नाश्त्यामध्ये दाक्षिणात्या पदार्थ खायला सगळ्यांनाच(Recipe) आवडते. या सगळ्यांमध्ये डोसा खायला तर सगळ्यांनाच आवडते. डोसामध्ये अनेक प्रकार पहायला मिळतात. साधा डोसा, पनीर डोसा, रवा डोसा. यातला रवा डोसा हा बनवायला अतिशय सोपा आणि चवीला उत्तम लागतो.
सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्याला(Recipe) बनवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हा डोसा बनवण्यासाठी फार साहित्याची गरज भासत नाही. कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात हा डोसा तयार होतो. ही एक परफेक्ट ब्रेकफास्ट रेसिपी आहे, जी कमी वेळेत बनवता येते. या डोसाची चव देखील मस्त लागते. चला तर मग जाणून घेऊयात रवा डोसाची ही सोपी रेसिपी.
रवा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- रवा १ कप
- तांदळाचे पीठ १ कप
- हिरवी मिरची बारीक चिरलेली
- आले बारीक चिरलेले
- जिरे अर्धा चमचा
- काळी मिरी पावडर अर्धा चमचा
- हिंग चिमूटभर
- तेल आवश्यकतेनुसार
- चवीनुसार मीठ
रवा डोसा बनवण्याची सोपी पद्धत
- रवा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये रवा आणि तांदळाचे पीठ एकत्रितपणे मिसळा.
- आता या मिश्रणात जीरे, हिंग, हिरवी मिरची, आलं काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ मिसळा.
- आता या मिश्रणात तुमच्या अंदाजानुसार पाणी मिसळा आणि डोसाचे बॅटर तयार करून घ्या.
- साधारणपणे अर्ध्या तासासाठी हे डोसा बॅटर झाकून ठेवा.
- अर्ध्या तासानंतर आता डोसा करायला घ्या.
- गॅसवर डोसा पॅन गरम करायला ठेवा. या पॅनवर तेल पसरवून घ्या आणि डोसा बॅटर घाला.
- डोसा बॅटर जास्त पातळ असता कामा नये याची काळजी घ्या.
- आता रवा डोसा दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.
- तुमचा गरमागरम रवा डोसा तयार आहे.
- नारळाची चटणी किंवा सांबारसोबत हा रवा डोसा खायला घ्या.
हेही वाचा :
…तर गयानात हिंदुस्थानचा उपांत्य सामना
सर्वच मतदारसंघांत गोंधळ घातलात, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ कसे घेणार!
छत्रपती संभाजीराजे याचं अत्यंत महत्त्वाच वक्तव्य काय?