12 ऑगस्ट रोडी सूर्यग्रहण आहे आणि ग्रहाणाचे राशींवर देखील चांगले वाईट परिणाम होत असतात. अशात ऑगस्टमध्ये होणाऱ्या ग्रहणामुळे तीन राशींचं भाग्य उजळणार तर, 2 राशींनी सावधगिरी बाळगावी… असं सांगण्यात येत आहे… तर कोणत्या आहे त्या राशी जाणून घ्या…

हिंदू धर्मात ग्रहणाला फार मोठं महत्त्व देण्यात आलं आहे. या काळात काय करावं आणि काय नाही याबद्दल देखील सांगितलं जातं. यंदाच्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण होणार आहे.. (eclipses) म्हणून आकाशातील ही नेत्रदीपक घटना ज्योतिष आणि खगोलशास्त्रप्रेमींसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या खगोलीय घटनेने जगभरात नवी आशा आणि उत्सुकता निर्माण केली आहे. ही खगोलीय घटना प्रामुख्याने आर्क्टिक, ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन आणि अटलांटिक महासागराच्या विस्तीर्ण भागांमध्ये स्पष्टपणे दिसेल. या भागांतील लोकांना खग्रास सूर्यग्रहणाचे दृश्य पाहता येईल.
सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. यामागे देखील फार मोठं कारण आहे. ग्रहणाच्या वेळी भारतात रात्र असणार आहे आणि सूर्य क्षितिजाच्या खाली असेल ग्रहणाचा मार्ग प्रामुख्याने उत्तर गोलार्ध आणि युरोपमधून जात असल्यामुळे, ते आशिया खंडाच्या दक्षिण भागांमध्ये दिसणार नाही. त्यामुळे, भारतात सुतकाचे कोणतेही नियम लागू होणार नाही, कारण ग्रहण भारतात दिसणार नाही.
मेष राशीला मोठा आर्थिक लाभ: जरी हे ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी, ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण मेष राशीसाठी अत्यंत शुभ आहे. या काळात मेष राशीला भूतकाळात केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल. कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची स्पष्ट शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि समाजात त्यांची आदर व प्रतिष्ठा लक्षणीयरीत्या वाढेल.
सिंह राशीला मिळतील नव्या संधी: सूर्य सिंह राशीचा स्वामी असल्याने, हे ग्रहण त्यांना विलक्षण शक्ती आणि नवीन संधी देईल. या काळात मालमत्तेसंबंधीचे प्रलंबित वाद पूर्णपणे मिटतील. आर्थिक अडचणींनी त्रस्त असलेल्यांना चांगला दिलासा मिळेल आणि बेरोजगारांना त्यांच्या स्वप्नातील इच्छित नोकरी मिळण्याची अधिक संधी मिळेल.
धनु राशीच्या व्यक्तींना शुभेच्छा : सूर्यग्रहण धनु राशीसाठीही अत्यंत शुभ असेल. या काळात त्यांची आध्यात्मिक कार्यांमधील आवड वाढेल. (eclipses) ज्यांना परदेश प्रवासाची इच्छा आहे, त्यांची स्वप्ने या काळात पूर्ण होतील. तसेच, कुटुंबात विविध शुभ घटना घडतील आणि आरोग्यात मोठी सुधारणा होईल.
वृषभ आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी घ्यावयाची खबरदारी काही राशी भाग्यवान असल्या (eclipses) तरी, वृषभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात थोडी सावधगिरी बाळगावी. या ग्रहणाच्या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक करणं किंवा कोणाकडूनही कर्ज घेणं टाळा. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनातील अनावश्यक वादविवाद आणि भांडणांपासून दूर राहणं तुमच्या मनःशांतीसाठी चांगलं आहे.
2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब?
अनिल परब यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता?