गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या संदर्भात दूध संस्था ठरावधारक मतदारांच्या भेटी गाठी साठी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर(meet) यांचा ताफा सैनिक टाकळी ता शिरोळ गावात आला असता, येथील माजी सैनिक, पूरग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.

या घटनेला प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीला विरोध आणि आंदोलनादरम्यान माजी सैनिक व शेतकऱ्यांवर झालेल्या कथित मारहाणीची किनार होती.विशेष म्हणजे आमदार यड्रावकर यांच्या सोबत गोकुळ दूध संघांचे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासह गोकुळ मधील मात्तब्बर माजी संचालक व इच्छुक उमेदवार व समर्थक कार्यकर्ते दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी होते. (meet) यावेळी “आमदार यड्रावकरांचा निषेध असो”, “सैनिक टाकळी एमआयडीसी रद्द झालीच पाहिजे” अशा घोषणाही देण्यात आल्या.
आंदोलनादरम्यान माजी सैनिक व शेतकऱ्यांना झालेल्या कथित मारहाणीमुळे तसेच राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा आरोप झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. गायरान जमीन गावाच्या विकासासाठी राखीव ठेवावी आणि प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसी रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (meet) यावेळी वायुसेनेचे अमर पाटील, नितीन पाटील, प्रदीप पाटील, हनुमंत पाटील, दत्तात्रय पाटील, विद्यानंद पाटील, महेश पाटील, अशोक पाटील, शरद पाटील, संभाजी पाटील, भरत पाटील, विजय पाटील, आनंदराव चव्हाण, दिलीप पाटील, संदीप पाटील तसेच सकल मराठा समाजाचे अमर पाटील, यांच्यासह माजी सैनिक, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा :
माधुरी वनतारामधून निघाली शुक्रवारी पहाटेपर्यंत नांदणीत पोहचणार?
LPG गॅस बुकिंगचा नियम बदलला जाणून घ्या नवीन नियम?
एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत, जास्त खात्याने काय समस्या येऊ शकते ?