इचलकरंजीत भरधाव मोटार बसस्थानकात घुसली वृद्धाचा रिपोर्ट पाच?

इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानकात भरधाव कार थेट प्रवाशांच्या गर्दीत घुसल्याने अपघातात नंदा वसंत कोळी (वय ६५, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाले. (Ichalkaranji) दरम्‍यान, अपघातानंतर कारचालक पळून गेल्‍यावर दुसर्‍याच तरुणाने मीच चालक असल्‍याचा बनाव केल्‍यावर जमाव आक्रमक बनला, त्‍यांनी कारवर लाथा मारत रोष व्‍यक्‍त केला.

महावीर उपाध्ये (रा. सांगली), बसव्वा नरसिंग इंगळे, फरीदा झाकीरहुसेन शेख (दोघी रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यांच्यासह अन्य दोघे असे पाचजण जखमी असून, अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. इचलकरंजी बसस्थानकाच्या आवारात दुपारी एकच्या सुमारास भरधाव चारचाकी कार घुसली. प्रथम कठड्याला धडकून ती थेट प्रवाशांच्या गर्दीत घुसली. (Ichalkaranji) यावेळी बायपास शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णालयात नियमित तपासणी करून कुंभोजला जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या नंदा कोळी यांना जोरदार धडक बसली. त्या अक्षरश: काही फूट फरफटत जाऊन चिरडल्या गेल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, अन्य पाच जखमी झाले. प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने अनेकांची पळापळ झाली. पुढे जाऊन कार थांबलेल्या बसवर आदळली.

यावेळी प्रवाशांची मोठी घाबरगुंडी उडाली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर एक युवक स्वत: चालक असल्याचा दावा करू लागल्याने नागरिक संतप्त झाले. काहींनी मोटारीवर लाथा मारून संताप व्यक्त केला. यावेळी तणाव निर्माण झाला होता. जखमींवर इंदिरा गांधी इस्पितळात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त वाहनावर फलक, पोलिसांचा पट्टा आणि काठीसुद्धा दिसून आल्याची घटनास्थळी चर्चा होती. (Ichalkaranji) दरम्यान, अपघातप्रकरणी संगीता विनोद कोळी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सतीश भीमराव कुराडे (रा. सुतार मळा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातात बसचे २५ हजारांचे नुकसान झाले आहेत.

इचलकरंजी बसस्थानकात सकाळी, सायंकाळी मोठी गर्दी असते. दुपारच्या सुमारास प्रवाशांची संख्या कमी होती. अशातच भरधाव कार बसस्थानकात घुसल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. मोटार आपल्या दिशेने येताना पाहून काही महिला किंचाळल्या. अनेकांनी पळ काढला. कार थेट बसवर आदळल्याने बसमधील प्रवासी हादरून गेले. प्रसंगावधान दाखवल्यामुळे काहीजणांचा यावेळी जीव बचावला.

हेही वाचा :

फुटीचा शाप असलेली शिवसेना!

विधान परिषदेसाठी आज होणार मतदान?

SBI मध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती जाणून अर्ज प्रक्रिया?