सोशल मीडियावर नेहमीच अनेक विचित्र घटना व्हायरल होत असतात, ज्या आपल्या कल्पनेपलीकडच्या ठरतात. (Elephant )आताही इथे अशीच घटना इथे मोठ्या प्रमाणात झाली आहे ज्यात चक्क एक हत्ती हवेत उडताना दिसून आला. आपल्या विशालकाय शरीरामुळे ओळखला जाणाऱ्या हत्तीला असे हवेत उडताना पाहून सर्वच हादरून गेले. कोल्हापुरात अचानक आलेल्या चक्रीवादळात हे दृश्य दिसून आले, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतेले. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कोल्हापूरमधला असून यात दिसते की, अचानक वादळ आले आहे ज्यामुळे सर्वत्र लोकांचा गोंधळ होतो. जमिनीवरील मातीही यावेळी हवेत वादळासह उडून जाताना दिसून येते. या वादळात कित्येक वस्तू उडून जात असतात मात्र यातच आपल्याला एक अनोखे दृश्य दिसून येते जे सर्वांचेच लक्ष वेधून घेते. अहो, आजवर तुम्ही वादळात अनेक मोठ्या गोष्टी उडून जाताना पाहिल्या असतील मात्र तुम्ही वादळात कधी हत्ती उडताना पाहिला आहे का? व्हिडिओत एक हत्ती वादळ येताच हवेत घिरट्या घालताना दिसून येत आहे.
पण वास्तविक, वजनदार हत्ती हवेत उडून जाणे शक्य नाही. अशात व्हिडिओत जो हत्ती दिसून आला (Elephant )तो खराखुरा हत्ती नसून प्लॅस्टिक बॅगने फुगवलेला हत्ती आहे. हा असा खोटा फुग्याप्रमाणे हवा भरून फुगवलेला हत्ती अधिकतर पार्टी किंवा बर्थडे पार्टीजमध्ये वापरला जातो. मात्र व्हिडिओत हत्तीला असे उडताना पाहून अनेकांना तो खराच हत्ती असल्याचा भास झाला. हत्तीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे (Elephant )व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हत्ती प्लॅस्टिक बॅगचा आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक युजर्सने पाहिले असून हजारो युजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, हत्ती उडून गेला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजपर्यंत ऐकले होते आज बघितलं पण, उड हत्ती उड”.
हेही वाचा :