‘नीट’ परीक्षेत अपयश विद्यार्थिनीने संपविले जीवन?

कराड तालुक्यातील शेरे स्टेशन परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नीट (NEET) परीक्षेत अपयश आल्यामुळे नैराश्यात गेलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी उंदराच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. (NEET exam) समीक्षा दीपक पवार असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीक्षाने गेल्या वर्षी नीट परीक्षा दिली होती. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने ती मानसिक तणाव आणि नैराश्यात होती. या मानसिक अवस्थेतच तिने २३ जुलै रोजी उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी वड्या खाल्ल्या. हा प्रकार तिने सुरुवातीला घरातील कोणालाही सांगितला नव्हता.

विषाचा परिणाम दोन दिवसांनी जाणवू लागल्यानंतर तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. (NEET exam) त्यानंतर तिने कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली. नातेवाईकांनी तातडीने तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या तणावामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.(NEET exam) या प्रकरणाचा पुढील तपास मसूर पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील पन्हाळे करत आहेत.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?