कोल्हापूर दारू पिण्यासाठी रिक्षाने फुकट न सोडल्याच्या रागातून चौघा सराईत गुंडांनी शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पिता-पुत्रावर गुप्तीसह कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. (alcohol) हल्ल्यानंतर परिसरात दहशत माजविणाऱ्या तिघा गुंडांच्या मुसक्या शाहूपुरी पोलिसांनी आवळल्या होत्या. सोमवारी सायंकाळी या तिघांचा माज उतरवत कदमवाडी परिसरातून धिंड काढली.

रिक्षाचालक रवींद्र सखाराम बावणे (वय ५७, रा. साळुंखे कॉलनी, कदमवाडी) व त्यांचा मुलगा तेजस यात जखमी झाले होते. याप्रकरणी स्वप्निल आबाजी आडूळकर (रा. माळ गल्ली, सुवर्णदीप अपार्टमेंट, कदमवाडी), अजय राजू येडगे (रा. अयोध्या कॉलनी, कदमवाडी), लक्ष्मण रामचंद्र बाऊदणे (रा. साळुंखे कॉलनी, कदमवाडी) यांना अटक केली असून, विजय ऊर्फ बंडू बयाजी गावडे (रा. विठ्ठल मंदिर चौक, कदमवाडी) याचा शोध सुरू आहे.
दि. २३ रोजी सायंकाळी चौघेही संशयित गांधीनगर येथील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी जात होते. (alcohol) त्यांनी रवींद्र बावणे यांची रिक्षा थांबवून तू आम्हाला फुकट सोड, अशी दमदाटी केली. यास बावणे यांनी नकार दिला. याचा राग मनात धरून चौघांनी बावणे पिता -पुत्रावर शुक्रवारी रात्री प्राणघातक हल्ला केला. बावणे यांच्या पोटावर आणि उजव्या हातावर गुप्तीने तसेच कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल होताच शाहूपुरी पोलिसांनी रविवारी या तिघांना अटक केली.
चौघांची कदमवाडी परिसरात प्रचंड दहशत आहे. साळुंखे पार्क परिसरात ज्या ठिकाणी हल्ला करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला, त्याच ठिकाणी पोलिसांनी या तिघांना फिरवून (alcohol) त्यांचा रुबाब उतरविला. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह फौजफाटा तैनात केला होता.सराईत गुंड स्वप्निल आडूळकरवर ७ ते ८ गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली होती. तसेच येडगेवर गांजा तस्करीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?