भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये भारताला इंग्लंडची बरोबरी साधायची (will)असेल तर त्यांना काहीही करून मँचेस्टरमध्ये होणारा चौथा टेस्ट सामना जिंकावा लागणार आहे. परंतू या सामन्यापूर्वी टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं असून संघातील एक स्टार खेळाडू थेट संपूर्ण सीरिजमधूनच बाहेर पडलाय. यापूर्वी अर्शदीप सिंह आणि आकाश दीप यांच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता सलग तिसऱ्या दिवशी अजून एका खेळाडूच्या दुखापतीच्या बातमीने टीम इंडियावरचं टेन्शन वाढलंय.

कोणाला झाली दुखापत?
ईएसपीएन क्रिकइंफोच्या एका रिपोर्टनुसार भारतीय ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी हा दुखापतीमुळे संपूर्ण सीरिजमधून बाहेर पडला आहे. नितीश गुडघ्याच्या दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर पडला(will) असून ही दुखापत त्याला सरावादरम्यान झाली. त्याचा स्कॅन काढण्यात आला तेव्हा लिगामेंट इंजरीबाबत समजलं. ज्यामुळे तो सीरिजमधील उर्वरित दोन सामने खेळू शकणार नाही.
नितीशचा जबरदस्त परफॉर्मन्स :
नितीश कुमार रेड्डी दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये प्लेईंग 11 चा भाग होता. बर्मिंघम टेस्टमध्ये त्याचा परफॉर्मन्स खास ठरला नाही तो यात फक्त 2 धावा करून बाद झाला. त्याला या सामन्यात विकेट सुद्धा मिळाली नव्हती. परंतु लॉर्ड्समध्ये त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी उत्तम झाली आणि यत्यंने 3 विकेट घेतले तर 43 धावा सुद्धा केल्या होत्या. आता नितीश कुमार रेड्डी सीरिजमधून बाहेर पडल्यावर त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अर्शदीपला कशामुळे झाली दुखापत?
मँचेस्टर टेस्टपूर्वी नेटमध्ये सराव करत असताना साई सुदर्शनचा शॉट पकडताना अर्शदीपच्या डाव्या हाताला दुखापत झाली. सहाय्यक कोच रियान टेनने सांगितलं की, मँचेस्टर टेस्ट जवळ येत असताना आम्ही संघ संयोजनाचा निर्णय घेऊ, विशेषतः अर्शदीपची प्रकृती लक्षात घेता. त्याला एक कट आला, पण तो किती खोलवर आहे हे पाहणे बाकी आहे. वैद्यकीय पथकाने त्याला डॉक्टरकडे नेले आहे आणि त्याला टाके लागतील की नाही हे सुद्धा अजून पहावं लागेल.
अंशुल कंबोजची एंट्री :
ग्रोइनच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या आकाशदीपने आतापर्यंत दुसरा आणि तिसऱ्या टेस्ट सामना खेळला आहे. पण अर्शदीप सिंहने आतापर्यंत सीरिजमधील एकही सामना खेळला नाही. आकाशदीप चौथ्या टेस्ट सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. तर अर्शदीपचं मँचेस्टर टेस्टमध्ये खेळणं जरा अवघडच वाटतंय. ज्यामुळे सिलेक्टरनी अंशुल कंबोजला बोलावलं आहे.
हेही वाचा :
14 वर्षे जुन्या ‘एसएमटी’तून दररोज 2000 शालेय मुलींसह 7000 प्रवाशांचा प्रवास! नोव्हेंबरमध्ये सोलापुरातून धावणार केंद्र सरकारच्या नव्या इलेक्ट्रिक बस
लोकल गर्दी कमी होणार? राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल
ऐनवेळी साक्षी पलटली! दामिनीच्या प्लॅनची माती, अर्जुनची विजयाच्या दिशेने घोडदौड, प्रियाला खबरी म्हणत टोमणा