आफ्रिकेतील माली देशातून एक धक्कादायक बातमी समोरआली आहे. येथे एका सिमेंटच्या कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांना अल कायदा या दहशतवादी(Terrorist) संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. एका रिपोर्टनुसार गुरुवारी अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.

पश्चिम आफ्रिका खंडातील माली या देशात सातत्याने दहशतवादी(Terrorist) हल्ले होत आहेत. याच दरम्यान दहशतवाद्यांनी भारतीयांचे अपहरण केले आहे. या घटनेची भारत सरकारने गंभीर दखल घेतली असून त्यांच्या सुटकेने माली सरकारने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भारतीय नागरिकांच्या अपहरणानंतर माली सरकारने त्यांच्या सुटकेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात असे भारत सरकारने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने कायेस येथील डायमंड सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीयांच्या अपहरणारवर चिंता व्यक्त केली आहे. ही घटना 1 जुलै रोजी घडली. या दिवशी हल्लेखोरांनी कारखान्याच्या परिसरात हल्ला केला आणि तीन भारतीय नागरिकांना जबरदस्तीने ताब्यात घेतले अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
अल कायदा या दहशतवादी(Terrorist) संघटनेशी संबंधित जेएनआयएम या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. परंतु, भारतीयांच्या अपहरणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मालीत मागील काही वर्षांत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यात बमाकोत अनेक ठिकाणी हल्ले झाले होते.

या हल्ल्यात 77 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. याआधी 7 सप्टेंबर 2023 मध्ये टिंबकटू नजीक नायजर नदीत एक नौकेवर हल्ला झाला होता. यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेटच्या रिपोर्टनुसार या हल्ल्यात 74 लोकांचा मृत्यू झाला होता. यात 49 नागरिक तसेच 20 हल्लेखोर आणि नौकेतीस सुरक्षा पथकातील लोकांचा समावेश होता.
हेही वाचा :
पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर..
SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?
वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान