मुलींच्या शिक्षणासाठी सरकार देतंय ५०,००० रुपये; मुख्यमंत्री राजश्री योजना आहे तरी काय?

केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.(education)केंद्र सरकारसोबतच इतर अनेक राज्यांच्याही सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, त्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री राजश्री योजना. राजस्थान सरकारने ही योजना सुरु केली आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशातून ही योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींना ५०,००० रुपये दिले जातात.राजश्री योजना ही २०१६ मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेत मुलींचे पालनपोषण करण्यासाठी मदत केली जाते. या योजनेत ५०,००० रुपये दिले जातात.(education)मुख्यमंत्री राजश्री योजनेचा लाभ फक्त मुलींनाच मिळतो. मुलगी राजस्थानमधील रहिवासी असावी. मुलीचा जन्म २०१६ नंतर झालेला असावा. तसेच मुलीच्या आईकडे भामाशाह कार्ड असणे गरजेचे आहे.

कुटुंबात फक्त दोन मुलींना हा लाभ मिळतो. यासाठी मुलीच्या १२वीचे कॉलेजचे प्रवेश प्रमाणपत्र, आईवडिलांचे आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, स्वयं घोषणा पत्र, ममता कार्ड, शाळेचे प्रमाणपत्र, बारावीची मार्कशीट, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो आणि बँक खाते पासबुक गरजेचे आहे.

या योजनेत मुलीच्या जन्मानंतर ते १२वी पास होईपर्यंत पैसे दिले जातात. पहिला हप्ता मुलीच्या जन्मानंतर दिला जातो. २५०० रुपये दिले जातात. दुसरा हप्ता मुलगी एक वर्षाची झाल्यावर दिला जातो. (education)हा २५०० रुपयांचा असतो. त्यानंतर तिसरा हप्ता ४००० रुपयांचा दिला जातो. मुलगी जेव्हा सहावीत जाते तेव्हा ५००० रुपये दिले जातात. पाचवा हप्ता मुलगी १०वीत गेल्यावर दिला जातो. तेव्हा तिला ११,००० रुपये दिले जातात. यानंतर सहावा हप्ता २५००० रुपयांचा असतो. जो मुलगी १२वीत गेल्यावर दिला जातो.

हेही वाचा :

उद्या शुक्रवारी बंद राहणार सर्व बँका; जाणून घ्या RBI ने 27 जूनला का दिली आहे सुट्टी

NHAI वर दुचाकी वाहनांनाही द्यावा लागणार टोल, १५ जुलैपासून लागू होणार नियम

नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका