पावसाने घातलंय थैमान! नद्या झाल्या आहेत उथळ!

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी पावसाने किरकोळ हजेरी लावली होती. यंदाचा पाऊस सरासरी पेक्षा कमी आहे असा अंदाज हवामान विषयक तज्ञांनी व्यक्त केल्यामुळे चिंतेचे वातावरण होते. आता जुलै महिन्याच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या पावसाने चिंतेचे वातावरण तयार केले आहे. राज्यात कोसळधारा सुरू असून आत्तापर्यंत दहापेक्षा अधिक बळी गेले आहेत. सर्वाधिक बळी मुंबई महानगरात झालेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई येथे रेड अलर्ट जाहीर केला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थितीने गंभीर वळण घेतले आहे अनेक शहरातील रस्त्यांना नद्या नाल्यांचे रूप आले आहे.

निसर्ग निर्मित संकटाला स्थानिक प्रशासनही जबाबदार आहे. यंदा प्रथमच मुंबईसारख्या महानगरात उन्मळून पडण्याचे प्रकार वाढलेले आहेत. वास्तविक पावसाळ्याच्या आधी महानगरातील नालेसफाई केली जाते. (weather) पण त्याचबरोबर आता महानगराच्या उद्यान विभागाने रस्त्यावरील झाडांची नेमकी स्थिती काय आहे याची पाहणी केली पाहिजे. स्ट्रक्चरल, फायर ऑडिट जसे केले जाते तसेच आता झाडांचेही ऑडिट करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे लोकांनी त्यांच्या परिसरातील कमकुवत बनलेल्या किंवा कोणत्याही क्षणी उन्मळून पडतील अशा झाडांविषयी महापालिकेच्या उद्यान विभागाला सतर्क केले होते तिकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्यामुळे मुंबई महानगरात अनेक जुनाट वृक्ष उमळून पडून तिघांचे बळी गेले आहेत तर अनेक वाहनांचा चुराडा झाला आहे. उद्यान विभागाला पडझडीचे प्रकार टाळता आले असते. जीवित हानी टाळता आली असती.ठाणे शहरात एक मोठे होर्डिंग रस्त्यावर कोसळले.

मानखुर्द येथे एक तीन मजली इमारत कोसळून पाच बालकांसह एका महिलेचा बळी गेला आहे. धोकादायक इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे हे बळी गेले आहेत असे म्हणता येईल.गेल्या सहा सात दिवसापासून सुरू झालेल्या कोसळधारामुळे नद्यांनी आपले पात्र सोडले आहे. नद्यांचे पाणी बाहेर पडले आहे. चार-पाच दिवस अतिवृष्टी झाली की नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते. त्याचे कारण असे आहे की, राज्यातील बहुतांशी नद्या या गाळाने भरलेल्या आहेत. (weather) त्यामुळे त्या उथळ बनलेल्या आहेत. आणि म्हणूनच त्या पात्राबाहेर पडतात. वास्तविक स्थानिक प्रशासनाने राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून घेऊन नद्यांमध्ये साचलेला गाळ बाहेर काढण्याचे एक अभियान पावसाळ्यापूर्वी सुरू केले पाहिजे. नद्यांमधील गाळ हा शेतीसाठी अतिशय उपयुक्त असतो. तो शेतकऱ्यांना मोफत दिला पाहिजे. शेतकऱ्यांनीही तो स्वखर्चाने आपल्या शिवारापर्यंत नेला पाहिजे.

नद्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढून टाकण्याचे प्रयत्न आत्तापर्यंत झालेले नाहीत. एकदा या सर्व नद्या गाळमुक्त केल्या तर त्यांची पाणी संचय क्षमता वाढेल. त्यामुळे नद्या पात्रा बाहेर लगेच पडणार नाहीत. पूरस्थिती ही गंभीर बनणार नाही. परिणामी शेतीचे नुकसान होणार नाही. जेथे डोंगर आहे किंवा मोठाली टेकडी आहे तेथे भूस्खलनाचा आणि म्हणूनच त्या परिसरात बांधकामांना परवानगी देऊ नये. (weather) काही वर्षांपूर्वी माळीण हे गाव तसेच इरशाळवाडी भूस्खलनात जमिनीत गाडले होते. कितीतरी लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. मावळ येथील एका घरावर दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे. एकूणच गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. पण तरीही पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे असे नाही. जून महिन्यातील कसूर जुलैमध्ये भरून निघाली आहे इतकेच. डोंगर माथ्यावरील झाडांची कत्तल झाल्यामुळे तेथील माती पावसाच्या पाण्याबरोबर खाली वाहून येते. दरडी कोसळण्याचे प्रकार त्यामुळेच वाढलेले आहेत. म्हणूनच पावसाचे हे संकट आसमानी असले तरी त्याला स्थानिक प्रशासनही तितकेच जबाबदार आहे. म्हणूनच एका अर्थाने हे संकट मानवी सुद्धा आहे.

हेही वाचा :

LPG गॅस सिलिंडरचे संकट संपणार, भारतीय तेल कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय?

शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससोबत?

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो सावधान? तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?