आग्रा येथील खंडौली परिसरात पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी(examination) आलेल्या एका तरुणीवर बलात्कार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पीडितेच्या तक्रारीवरून खंडौली पोलिस ठाण्यात बलात्कार, आयटी कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर, आरोपीने उच्च न्यायालयात जामीन अर्ज सादर केला आहे.

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील जाजोद पोलीस स्टेशन परिसरातील खतुंड्रा गावातील रहिवासी नरेश मीना उर्फ नरसा राम मीना यांना उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, तुरुंगातून सुटल्यानंतर तीन महिन्यांच्या आत आरोपीने पीडितेसोबत विवाह करावा, अशी अट घालण्यात आली आहे.
जिच्यावर बलात्कार, अश्लिल फोटो व्हायरल केले; तिच्याशीच करावं लागणार लग्न, कोर्टाचा निर्णय काय?पीडितेने खंडौली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ती एका खाजगी कोचिंग संस्थेमध्ये पोलिस भरती परीक्षेची तयारी करत होती. आरोपी देखील त्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षांची (examination)तयारी करत होता. दोघांमध्ये ओळख झाली आणि संवाद सुरू झाला.
तक्रारीनुसार, आरोपी नरेशने पोलिस भरतीमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने तरुणीकडून ९ लाख रुपये मागितले. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी तो तिला पोलिस भरती परीक्षेसाठी आग्रा येथे घेऊन गेला. मात्र, वैद्यकीय उपचाराचे कारण देत त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले. तिथे त्याने तरुणीच्या शरीरावर काही पावडर लावली, ज्यामुळे तिचे शरीर सुन्न झाले. या संधीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ तयार केले. त्यानंतर त्याने या फोटो व व्हिडिओच्या आधारे तरुणीला ब्लॅकमेल करून (examination)वारंवार तिच्यावर बलात्कार केला.जिच्यावर बलात्कार, अश्लिल फोटो व्हायरल केले; तिच्याशीच करावं लागणार लग्न, कोर्टाचा निर्णय काय? पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी २१ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल केला आणि संबंधित आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले.
हेही वाचा :
पाचव्यांदा आई होणार सीमा हैदर; बेबी शॉवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल
घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी
इचलकरंजीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी जल फवारणी यंत्रणेची मागणी