राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक बदल केले जात आहेत. पक्षाने नुकतीच 15 नव्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती.आता महिला विंगमध्ये मोठा बदल होणार आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष बदलण्यात येणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरूय.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पद विदर्भाकडे जाणार आहे. नागपूर विभागातून महिला अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. खान्देशमधून रोहिणी खडसे यांनी महिला अध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षात सरस कामगिरी केली आहे. (Sharad Pawar) आता त्यांचा कार्यकाळ संपणार असून त्यांच्या जागी नवीन महिला अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे.
या महिला नेत्याचं नाव आहे चर्चेत (Sharad Pawar) यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महिला अध्यक्ष पद नागपूर विभागात देण्यात येणार आहे. येथील डॉ. अंजली साळवे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हस्ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहिणी खडसे यांच्यानंतर अंजली साळवे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्यानं रोहिणी खडसे यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सडेतोड भूमिका मांडणाऱ्या नेत्या अंजली साळवे या पक्षाची सडेतोड भूमिका मांडत असतात. (Sharad Pawar) याआधी राज्य महिला आयोगावरील अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नेमणुकीवरून त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. महिलांसाठी काम करणाऱ्या आणि महिलाविषयीक कायद्यांची जाण असणार्या महिलांनाच या पदावर नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली होती. केवळ महिलांच्या पुनर्वसनासाठी या पदाचा वापर करण्यात येऊ नये असे म्हटले होते.
हेही वाचा :
UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?
‘हुपरी’ प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे पाऊल परकीय चलनात बचत?
भारत अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 लोकांना अटक, पोलिसांनी असं का केलं?