स्वयंपाक घरात वापरली जाणारी साधने किंवा भांड्याचा वापर (kitchen)चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे जेवण करताना चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे.

प्लास्टिकच्या वस्तू:
प्रत्येक स्वयंपाक घरात असंख्य प्लास्टिकच्या वस्तू असतात. प्लास्टिकच्या वस्तूमध्ये डबे, बाटल्या, ताट इत्यादी अनेक वस्तूंचा वापर केला जातो. घरात असलेले प्लास्टिकचे चमचे किंवा वस्तू(kitchen) गरम तापमानात वारंवार राहिल्यामुळे झिजून जातात. ज्यामुळे अन्नपदार्थांमध्ये ‘BPA’ सारखी रसायने मिक्स होतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अनेक लोकांच्या लघवी चाचणीमध्ये BPA चे प्रमाण ९३% आढळून आले आहे. त्यामुळे स्वयंपाक घरात प्लास्टिक वस्तूंचा वापर करण्याऐवजी नलेस स्टील, सिलिकॉन किंवा बांबूचे साधन वापरावीत.
नॉन-स्टिक भांडी:
डोसा किंवा फ्राय पदार्थ बनवताना नॉन-स्टिक भांड्यांचा (kitchen)वापर केला जातो. या भांड्याचा वापर केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. नॉन-स्टिक भांड्यांमध्ये PFSA नावाचे रसायन आढळून येते. या रसायनाला ‘फॉरएव्हर केमिकल्स’ असे सुद्धा म्हंटले जाते. शरीरात हानिकारक रसायन दीर्घकाळ साचून राहिल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे जेवणातील पदार्थ बनवताना कायमच स्टेनलेस स्टील, कास्ट आयर्न किंवा पूर्णपणे सिरॅमिक असलेल्या भांड्यांचा वापर करावा.
मातीच्या भांड्याचा वापर:
हल्ली अनेक ठिकाणी जेवण बनवताना मातीच्या भांड्याचा वापर केला जात आहे. मातीच्या भांड्यांमध्ये असलेले घटक शरीरासाठी आरोग्यदायी ठरतात. याशिवाय योग्य भांडी आणि साधने वापरल्यास अन्नातील पोषण मूल्य कायम टिकून राहतात. त्यामुळे पचनसंस्था, हृदयाचे आरोग्य आणि हार्मोन संतुलन इत्यादी अनेक गोष्टी निरोगी राहण्यास मदत होते.
हेही वाचा :
फक्त ५ मिनिटांत बनवा झटपट आणि चविष्ट ‘दही चटणी टोस्ट’!
तुमचे दात मोत्यांसारखे चमकतील, फक्त ‘ही’ एक गोष्ट तुमच्या टूथपेस्टमध्ये करा मिक्स
कॉनव्हेनंतर रचीन रवींद्र-हेनरी निकोल्सचा झंझावात, न्यूझीलंड 600 पार, झिंबाब्वे विरुद्ध 467 धावांची भक्कम आघाडी