देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओचे(Jio) करोडो युजर्स आहेत. आपल्या याच युजर्ससाठी कंपनी नेहमीच स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. या प्लॅनचे वैशिष्ट्य असं असतं की, याची किंमत कमी असते आणि यामध्ये मोठी व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे ऑफर केले जातात. त्यामुळे अशा रिचार्ज प्लॅन्सना युजर्सची पसंती मिळते. याशिवाय दिर्घकाळ व्हॅलिडिटी असल्यानं वारंवार रिचार्ज करण्याची देखील गरज नसते.

आता देखील कंपनीने(Jio) एक असाच रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये कंपनी युजर्सना संपूर्ण वर्षाची व्हॅलिडीटी ऑफर करते. याशिवाय या रिचार्ज प्लॅनमध्ये सुपरफास्ट इंटरनेट देखील ऑफर केला जातो. चला तर मग कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया.
वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपावी आणि रिचार्जच्या वाढत्या किंमतींपासून सुटका व्हावी, यासाठी युजर्स दिर्घकाळ व्हॅलिडीटी असणाऱ्या प्लॅन्सची निवड करतात. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर संपूर्ण वर्षभर चिंता नाही. आता आम्ही तुम्हाला अशाच एका दिर्घकाळ व्हॅलिडीटी असणाऱ्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 3599 रुपये आहे. यामध्ये 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते.
जिओच्या 3599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2.5GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. ज्यामुळे सोशल मीडिया, नेट बँकिंग आणि इत्यादी कामं सुपरफास्ट होतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग देखील ऑफर केले जाते. याशिवाय रोज 100 SMS देखील मिळतात.

जर तुमच्या परिसरात जिओचे(Jio) 5G नेटवर्क कार्यरत असेल तर तुम्हाला अनलिमिटेड True 5G डेटाचा आनंद मिळणार आहे. ज्या युजर्सना जास्त इंटरनेट डेटाची गरज असते, अशा युजर्ससाठी हा प्लॅन फायद्याचा ठरणार आहे. जसं की, विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम यूजर्स, किंवा व्हिडीओ स्ट्रीमिंग करणारे युजर्स.
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ इंटरनेट आणि कॉलिंगच नाही तर डिजिटल एंटरटेनमेंट आणि क्लाउड स्टोरेजची सुविधा देखील मिळणार आहे. 90 दिवसांचा जिओ सिनेमा प्रीमियमचा मोफत अॅक्सेस मिळणार आहे. याशिवाय लाईव्ह टीव्ही चॅनेल पाहण्याची सुविधा आणि 50 जीबी मोफत क्लाउड स्टोरेज देखील ऑफर केलं जाणार आहे. या सर्व फायद्यांमुळे कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन एक ऑल-इन-वन डिजिटल पॅक बनतो.
हेही वाचा :
नागरिकांनो सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
आज अनेक शुभ संयोग; कन्यासह ‘या’ 5 राशींवर भोलेनाथ होणार प्रसन्न, मागाल ते मिळेल
“जा जा…” म्हणत अंगावर गेला, डोळे दाखवले मैदानात सिराज-ब्रुक भिडले! बाचाबाचीचा Video Viral