तुम्ही देखील सॅमसंग युजर आहात आणि स्मार्टफोनवरील ग्रीन लाईनच्या समस्येने हैराण झाला आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही सॅमसंगचा गॅलेक्सी एस22 अल्ट्रा किंवा गॅलेक्सी एस 21 सिरीजमधील स्मार्टफोन वापरल असाल आणि तुम्हाला ग्रीन लाईन समस्येचा सामना करावा लागत असेल तर ही बातमी नक्की वाचा. सॅमसंगचा गॅलेक्सी एस22 अल्ट्रा किंवा गॅलेक्सी एस 21 सिरीजमधील ज्या स्मार्टफोन युजर्स ग्रीन लाईन समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. Tarun Vats नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सॅमसंग ग्रीन लाइन समस्येमुळे प्रभावित झालेल्या स्मार्टफोनसाठी मोफत वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट पॉलिसीचा कव्हरेज कालावधी वाढवत आहे. एका टिपस्टरनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस22 अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस21स्मार्टफोन युजर आता सप्टेंबरपर्यंत भारतातील सेवा केंद्रांवर वन-टाइम स्क्रीन बदलण्यासाठी पात्र असतील.