आंबोली घाटात कर्नाटकातील पर्यटकांचा धुडगूस, धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजी; व्हिडिओ आला समोर

निसर्गरम्य आंबोली घाटात पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.(Ghat)पावसाळा सुरू होताच धबधब्यांच्या नजाऱ्यांना पाहण्यासाठी हजारो पर्यटक आंबोलीकडे गर्दी करत असतात. पण,या पर्यटनस्थळाचं शांत वातावरण गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. कर्नाटकातून आलेल्या काही पर्यटकांनी धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अक्षरशः धुडगूस घातला. त्यांच्या हुल्लडबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कर्नाटकातील तरुण रस्त्याच्या मधोमध गाड्या थांबवून मोठ्याने गाणी लावून नाचताना, ओरडताना आणि हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. काहीजण रस्त्यावर उभे राहून ‘डान्स पार्टी’ करत असल्याचंही स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या इतर पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या हालचालींना मोठा अडथळा निर्माण झाला.

धबधब्याकडे जाणारा रस्ता अरुंद असतानाही या पर्यटकांनी बेशिस्तपणे गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या. त्यामुळे वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली. अनेक पर्यटक आणि प्रवासी यामुळे वैतागले. (Ghat)वाहतूक कोलमडल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती. या सगळ्या प्रकाराने स्थानिक लोकांमध्येही संतापाची भावना आहे.

आंबोली परिसरातील स्थानिक नागरिकांनी या प्रकाराला तीव्र विरोध केला आहे. “प्रत्येक वर्षी पावसाळ्यात अशा पर्यटकांकडून शिस्तभंगाच्या घटना घडतात. हे पर्यटनस्थळ आहे की बाजारपेठ? आम्ही प्रशासनाला याविषयी तक्रार करणार आहोत,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. (Ghat)याआधीही अशा घटना आंबोलीत घडल्या असून, अनेकदा पोलीस आणि वन विभाग यांना कारवाई करावी लागली आहे.

हेही वाचा :

उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण

सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..