तुमच्या टूथपेस्टमध्ये विषारी घटकपदार्थ?, ब्रश करण्याआधी 100 वेळा कराल विचार!

दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर प्रत्येकजण ब्रश करतो. यावेळी वापरण्यात येणारी टूथपेस्ट वेगवेगळ्या कंपन्यांची असते. यात कोणी लवंग असल्याचा दावा करतात, कोणी मीठ असल्याचा तर कोणी फ्रेशनेस देण्याचे आश्वासन देतात. पण तुम्ही वापरत असलेल्या टूथपेस्टमध्ये विषारी घटकपदार्थ आहे, असे कोणी सांगितले तर? या विषयाची चर्चा होण्यामागचे कारणंही तसेच आहे. ब्रँडेड टूथपेस्टमध्ये पा-याची धोकादायक मात्रा आढळून आली आहे.

तुम्ही रोज सकाळी टूथपेस्टनं दात घासता. दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट वापरता असं तुम्हाला वाटत असेल. पण सकाळी सकाळी तुम्ही टूथपेस्टच्या नावाखाली धोकादायक शरिरासाठी विष असलेले पदार्थ दातांना लावत असल्याचं वास्तव समोर आलंय. आपण जी टूथपेस्ट दातांना लावतो त्यातील बहुतांश टूथपेस्टमध्ये धोकादायक घटक पदार्थ असल्याची माहिती समोर आलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *