ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत साखर कारखाने सुरू करू नयेत, (Tractor) अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करून कारखाने सुरू करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, मध्यरात्री महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला आग लावण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शेतकऱ्यांना उसाला योग्य दर मिळावा आणि दराबाबत समाधानकारक तोडगा निघावा, (Tractor) यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. ऊसदर निश्चित झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, अशी संघटनेची भूमिका आहे. या मागणीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने शेतकरी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येईल, (Tractor) असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांनी ही माहिती दिली. या बैठकीत ऊसदराच्या प्रश्नावर कोणता निर्णय होतो आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
अखेर पाऊस आला, राज्यात ऑक्टोबरच्या या तारखेला कोसळधारा, IMD चा महत्त्वाचा अंदाज आला